आदिवासी विकास विभाग भरती 2025 | एकूण पदे : 0661 जागा | आजचं अर्ज करा.

Adiwasi Vikas Vibhag Bharti 2025 : आदिवासी विकास मधील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील आश्रम शाळांमध्ये रिक्त असलेल्या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 0661 रिक्त पदे भरण्यात येणार असून, विविध पदांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेची अट ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत PDF जाहिरात नीट वाचून, आपण त्या पदासाठी पात्र आहोत की नाही, याची खात्री करूनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

ही भरती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असून, अर्ज फक्त ई-मेलद्वारे स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारांनी आपला अर्ज, शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे, अनुभव असल्यास त्याचे दाखले आणि इतर आवश्यक कागदपत्रे एकाच PDF फॉरमॅटमध्ये तयार करून दिलेल्या ई-मेल पत्त्यावर म्हणजेच unisec.tdd@gmail.com या पत्त्यावर पाठवायची आहेत. अर्ज पाठविताना ई-मेलमध्ये आपण कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत तसेच इच्छित तालुका किंवा जिल्ह्याचे नाव स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक आहे.

नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रभर असून संबंधित आश्रम शाळांमध्ये उमेदवारांची नेमणूक करण्यात येईल. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 24 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे, तसेच जाहिरात प्रकाशित झाल्यापासून दहा दिवसांच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचेही नमूद केलेले आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता, अटी व शर्ती समजून घेऊन, आवश्यक सर्व कागदपत्रांसह आपला अर्ज पाठवावा आणि या भरती संधीचा फायदा करून घ्यावा.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo