भूमि अभिलेख भरती 2025 | एकूण पदे : 0903 जागा | Bhumi Abhilekh Bharti 2025

Bhumi Abhilekh Bharti 2025 : भूमि अभिलेख विभागातील तब्बल 0903 रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा सुरू झाली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरती बद्दलची आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

Bhumi Abhilekh Bharti 2025 : Online applications are being invited from eligible candidates possessing the prescribed qualifications to fill as many as 0903 vacant posts in the Bhumi Abhilekh Bharti 2025. The facility to fill the application form online has been started. Bhumi Abhilekh Bharti 2025

पदाचे नाव व भरती विभाग

पदाचे नाव मासिक वेतन भरती विभाग एकूण पदे
भूकरमापक ₹19,900 ते ₹63,200 पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर 903

भूमि अभिलेख भरती 2025 : महत्वाची माहिती

◾भरती विभाग : भूमि अभिलेख विभाग द्वारे भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर यापेक्षा मोठी संधी असू शकत नाही.
◾एकूण पदे : तब्बल 0903 पदे भरली जात आहेत.
◾पदाचे नाव : भूकरमापक.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण व इतर पात्रता. (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 19,900 ते 63,200 रुपये पगार दिला जाणार आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : Permanent (कायमस्वरूपी) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾अर्ज सुरू : दिनांक 01 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.
◾इतर आवश्यक पात्रता :
१) मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यता प्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र.
२) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.
◾परीक्षा शुल्क :
1) अमागास प्रवर्ग : 1000 रूपये.
2) मागास प्रवर्ग : 900 रूपये.
◾नोकरी ठिकाण : पुणे, कोकण, मुंबई, नाशिक, छ. संभाजीनगर, अमरावती, नागपूर विभाग.

परीक्षा स्वरूप

अ. क्र. विषय एकूण प्रश्न कमाल गुण परीक्षेचे माध्यम कालावधी
1 इंग्रजी 25 50 इंग्रजी 30 मिनिटे
2 मराठी 25 50 मराठी 30 मिनिटे
3 सामान्य ज्ञान 25 50 मराठी व इंग्रजी 30 मिनिटे
4 बौद्धिक चाचणी / अंकगणित 25 50 इंग्रजी 30 मिनिटे
एकूण 100 200 120 मिनिटे

परीक्षा शुल्क

प्रवर्ग परीक्षा शुल्क
अमागास प्रवर्ग ₹1000/-
मागास प्रवर्ग ₹900/-

निवडीचे निकष

1) गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षेत एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
2) पदासाठी विहित केलेल्या अर्हता / अटी / शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे बनविलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांकडून विहित आरक्षणानुसार निवड यादी बनविण्यात येईल.
3) एकाच पदासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास खालील प्राधान्य क्रमाच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल :-
१) आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील.
२) समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल अथवा वरील अ.क्र. १ नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुणप्राप्त असतील तर त्यापैकी वयाने जेष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
३) वरील अनु क्र. १ व २ या दोन्ही अटीमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्हता (पदव्युत्तर पदवीधर, पदवीधर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे) धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात येईल.
४) वरील अनु.क्र. १, २ व ३ या तिन्ही अटींमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत, सदर पदाच्या सेवाप्रवेश नियमामध्ये विहित असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतर गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात येईल.

उमेदवारांसाठी सूचना

१) उपरोक्त पदांच्या सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज दि. ०१/१०/२०२५ पासून ते दि. २४/१०/२०२५ पर्यंत मागविण्यात येत आहेत.
२) एका उमेदवारास कोणत्याही एका विभागाकरीता अर्ज सादर करता येईल. एका उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज सादर केल्याचे आढळल्यास अशा उमेदवाराचा सर्वात शेवटी परिपुर्णपणे भरलेल्या अर्जात नमूद विभागाकरीता अर्ज सादर केल्याचे ग्राह्य धरुन इतर सर्व अर्ज बाद समजण्यात येतील व त्याबाबत कोणत्याही पत्रव्यवहाराची / तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.
३) विहीत पध्दतीने मुदतीत म्हणजेच दिनांक २४/१०/२०२५ पुर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने रक्कम भरण्याची कार्यवाही दि. २४/१०/२०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर वेबलिंक बंद होईल.
४) ऑनलाईन स्पर्धात्मक परीक्षा स्थगित व रद्द करणे, परीक्षेचे स्वरुप, तारीख व ठिकाणात बदल करणे, पदसंख्या, अनुशेष व आरक्षण यात वाढ किंवा घट करण्याचे अधिकार विभागास राहतील व विभागाचा निर्णय अंतिम असेल. त्याबाबत कोणताही दावा सांगता येणार नाही.
५) उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन (Online) पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने अर्ज करतांना शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक नाही. तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे.
६) ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरतांना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहील्यास व भरतीच्या कोणत्याही टप्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी तसेच शैक्षणिक अर्हता व मागणीनुसार आरक्षण, वयोमर्यादा, शिथीलीकरण इत्यादी पात्रता तपासूनच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावा.

अधिकृत जाहिरात व अर्ज लिंक

अधिकृत माहिती महत्वाच्या लिंक
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 24 ऑक्टोबर 2025 ही शेवटची दिनांक.
◾सविस्तर माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo