Jilha Parishad Bharti 2025 : जिल्हा परिषद अंतर्गत शासनाच्या योजना तसेच जिल्हा परिषद मार्फत असलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी त्या योजनांच्या अनुषगांने करण्यात येणा-या कामांना प्रसिध्दी देण्यासाठी तसेच जनता व जिल्हा परिषद यांच्यात समन्वय साधण्यासाठी तसेच सोशल मिडीया जि.प कामांची प्रसिध्दी करणेसाठी जनसंपर्क अधिकारी पदासाठी पात्र उमेदवारांकडून खालील नमुद अटी व शर्तीच्या अधीन राहुन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पदवीधर व इतर पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व अर्ज खाली पहा.
Jilha Parishad Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates for the post of Public Relations Officer subject to the following terms and conditions. However, graduates and other eligible interested candidates should submit their applications as soon as possible. See the vacant posts in the advertisement, other necessary information about it, pdf advertisement and application form below.
पदाचे नाव व कामाचा कालावधी
| पदाचे नाव | एकूण पदे | कामाचा कालावधी | शैक्षणिक पात्रता |
|---|---|---|---|
| जनसंपर्क अधिकारी | 01 | 11 महिने | पदवीधर उत्तीर्ण |
जिल्हा परिषद : महत्वाची माहिती
◾भरती विभाग : जिल्हा परिषद द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : जनसंपर्क अधिकारी.
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर व इतर (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 20,000/- रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मानधन दिले जाणार आहे.
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾इतर आवश्यक पात्रता :
(1) कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
(2) मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम ५०टक्के पेक्षा अधिक टक्केवारीसह उत्तीर्ण होऊन पूर्ण केलेला असावा.
(3) उमेदवाराने जिल्हांस्तरावरील “अ” व “ब” दर्जाच्या वृत्तपत्रामध्ये पाच वर्ष काम केल्याचा अनुभव असावा, यामध्ये किमान तीन वर्ष अर्जदाराने “अ” दर्जाच्या वृत्तपत्रात काम केलेले असावे.
(4) कोणत्याही संस्थेकडुन सामजिक कार्याकर्ता प्रशिक्षण घेऊन सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजसेवेचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
◾नोकरी ठिकाण : रायगड.
इतर अटी
1) जिल्हा परिषदेने ठरवून दिलेल्या मासिक मेहनताना रक्कम रू. २००००/- (अक्षरी र.रू. वीस हजार मात्र) प्रमाणे काम करणे अर्जदारास बंधनकारक राहिल.
2) नियुक्त अर्जदारास अदा केली जाणारी मासिक मेहनताना रक्कम ही कंत्राटी ११ महिन्यांसाठी स्वरूपाची असल्याने नियुक्त अर्जदारारस नियमित जिल्हा परिषद कर्मचारी संबोधले जाणार नाही. सबब त्याला कोणत्याही प्रकारे आणि कोणत्याही वेळेस शासकीय सेवेत कायम करण्याबाबत दावा करता येणार नाही. तसेच कोणत्याही क्षणी त्याची नियुक्ती संपुष्टात आणण्याचा किंवा मुदतवाढ देण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांच्याकडे राखुन ठेवण्यात आले आहेत.
3) अर्जदाराने अर्ज करण्याच्या सर्वसाधारण कार्यपध्दतीव्दारे विहीत मुदतीत अर्ज सादर करावा. तसेच अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. विहीत मुदतीत प्राप्त आणि शैक्षणिक अर्हता प्राप्त अशा पात्र अर्जदारांच्या अर्जाचाच विचार मुलखतीसाठी ग्राहय धरला जाईल
4) मुलाखतीच्या दिनांक, वेळ आणि ठिकाण याबाबतचा तपशिल अर्जदारांस पत्राने कळविला जाईल. ७अपवादात्मक परिस्थीतीमध्ये सदरची जाहिरात कारण न देता रद्द करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी राजिप अलिबाग यांच्याकडे राखून ठेवण्यात आला आहे.
अधिकृत जाहिरात व वेबसाईट
| अधिकृत माहिती | महत्वाच्या लिंक |
|---|---|
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 13 ऑक्टोबर 2025 दुपारी 03:00 वाजेपर्यंत फक्त अर्ज करता येणार आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : सामान्य प्रशासन विभाग, रायगड जिल्हा परिषद, कुंटेबाग, प्रशासकिय इमारत, अलिबाग, जि. रायगड, पिनकोड- ४०२२०१,
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.