जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत विविध नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर | Jilhadhikari Karyalay Bharti 2025

Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील, शासन निर्णय अन्वये जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत रिक्त जागा भरणेकामी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा निवड समिती, तथा जिल्हाधिकारी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. Pdf जाहिरात व अर्ज खाली पहा.

Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates for filling up the vacant posts under the Collectorate Office as per the Government Decision of Maharashtra Government, Revenue and Forest Department, Mantralaya, Mumbai. Eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.

पदे, पदसंख्या व मानधन

पदाचे नाव सामाजिक प्रवर्ग पदसंख्या एकत्रित मानधन
विधी अधिकारी (कंत्राटी) सर्वसाधारण 01 ₹50,000/-

आवश्यक पात्रता

◾भरती विभाग : जिल्हा निवड समिती, तथा जिल्हाधिकारी द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : खाली दिलेली जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 45,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾वयोमर्यादा : 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
◾भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने 11 महिन्याच्या करात तत्वावर पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : विधी अधिकारी.
◾इतर आवश्यक पात्रता :
1] उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व सनदधारक असावा (त्यांने बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचेकडील वकील म्हणून नोंदणी केलेली असावी).
2] जाहिरातीच्या दिनांकास या पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान 7 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
3] उमेदवार महसूल विषयक, सेवाविषयक व प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबत ज्ञान संपन्न असावा, ज्यामुळे कायदे विषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.
4] उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे.
5] विधी अधिकारी या पदासाठी उमेदवारांचे वय नियुक्तीच्या वेळी 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
◾एकूण पदे : 01 रिक्त पद भरण्यात आहे.
◾नोकरी ठिकाण : धुळे. (Jobs in Dhule)
◾सदर पदांची नेमणूक ही पूर्णतः कंत्राटी पध्दतीने असेल, त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा असणार नाही.
◾सदर नेमणूका करार पध्दतीने प्रथमतः 11 महिन्यांसाठी करण्यात येईल.
◾संबधित नियुक्ती प्राधिकारी शासनाच्या वतीने नियुक्तीच्यावेळी संबधितांबरोबर विहीत प्रपत्रात करार करतील. कराराचे विहीत प्रपत्र परिशिष्ट व मध्ये देण्यात आले आहे. कराराची सर्व कागदपत्रे जतन करुन ठेवणे ही संबंधीत कार्यालयाची जबाबदारी असेल.
◾करार पध्दतीने नेमणूक करण्यात येणा-या अधिकारी / कर्मचा-यांना एकत्रित मानधन आणि अनुज्ञेय दुरध्वनी व प्रवास खर्चा व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाही.
◾शासन निर्णय दि. 30 जुलै, 2011 व त्यासोबतचे परिशिष्ट अ मधील, तसेच परिशिष्ट व मधील संभाव्य करारनाम्यातील, तसेच शासन वेळोवेळी सुधारीत करेल अश्या अटी व शर्ती लागू राहतील.
◾प्राप्त होणाऱ्या अर्जाची छानणी करुन जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे व बार कॉन्सील कार्यालय (मा. जिल्हा न्यायालय) येथील नोटीस बोर्डावर पात्र/अपात्र उमेदवारांची यादी वेळोवेळी प्रसिध्ट करण्यात येईल.

अर्ज पद्धती, वय व इतर

नोकरी ठिकाण शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अर्ज पद्धत शेवटची तारीख
धुळे कायदा पदवीधर आणि सनदी 45 वर्षे ऑफलाईन 17 ऑक्टोबर

विधी अधिकारीयांची कामे

  1. जेथे शासनाच्या विरोधात न्यायालयाने निकाल दिलेला आहे अशा प्रकरणामध्ये न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून तनुषंगाने अपील दाखल करण्याच्या संदर्भात उचित कार्यवाही करणे.
  2. प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे तत्परतेने निकाली काढण्यासाठी सरकारी वकिलांकडे पाठपुरावा करणे, जेथे शासन प्रतिवादी आहे अशा प्रकरणी सादर करावयाची प्रतिज्ञापत्र संबधित अधिका-यांच्या मदतीने तयार करणे.
  3. शपथपत्राचा मसुदा तयार करणे व त्यास सक्षम प्राधिका-याची मान्यता घेऊन न्यायालयात विहीत मुदतीत सादर होईल हे पाहणे.
  4. कार्यालयाकडे प्राप्त होणा-या सर्व प्रकारच्या कायदेविषयक बाबींबाबत / न्यायालयीन प्रकरणी सल्ला देणे व न्यायालयीन प्रकरणे हाताळणे. महसूल विषयक / परिच्छेदनिहाय अभिप्राय (parawise comments) तयार करणे / सेवाविषयक / प्रशासकीय बाबी / विभागीय चौकशी इत्यादी तथा समकालीन कायद्याची प्रस्थापित स्थिती याबाबत सर्व प्रकरणी सल्ला देणे व ती प्रकरणे हाताळणे.
  5. अपील करणे योग्य असल्यास व तसा निर्णय झाल्यास अपीलाचा मसुदा तयार करून तो संबधित सरकारी वकिलांकडे पाठविणे व अपिलाचा अंतिम निर्णय लागेपर्यंत पाठपुरावा करणे.
  6. मा. जिल्हाधिकारी धुळे यांनी विधिविषयक कामकाजाबाबत वेळोवेळी नेमून दिलेले कार्य विहीत मुदतीत पार पाडणे.
  7. मा. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, महसूल न्यायाधिकरण व अन्य न्यायाधिकरणे यांचेकडे दाखल प्रकरणांची यादी अद्ययावत ठेवणेव वेळोवेळी सुनावणी दिनांकाबाबत अवगत करणे.
  8. जिल्हाधिकारी कार्यालय व त्यांचे अधिनस्त कार्यालये जसे उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय यांचे न्यायविषयक संबंधित विषय हाताळणे.

अधिकृत जाहिरात व अधिकृत वेबसाईट

अधिकृत माहिती महत्वाच्या लिंक
PDF जाहिरात येथे क्लिक करा
वेबसाईट येथे क्लिक करा

◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत फक्त अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे (आस्थापना शाखा).
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo