Maharashtra Government Jobs 2025 : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई संचालनालय, वैद्यकीय शिक्षण संशोधन, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Maharashtra Government Jobs 2025 : Applications are invited from eligible candidates in the prescribed format only through online mode to fill various vacant posts in Group-D (Class-4) cadre under the Directorate of Medical Education and Research, Mumbai, Ministry of Medical Education and Pharmaceuticals, Government of Maharashtra.
पदे व मासिक वेतन :
| अ. क्र. | पदनाम | वेतनश्रेणी | एकूण रिक्त पदे |
|---|---|---|---|
| 1 | शिपाई | एस – 1 ₹ 15,000 – 47,600 | 06 |
| 2 | शवविच्छेदन परिचर | एस – 1 ₹ 15,000 – 47,600 | 04 |
| 3 | शवविच्छेदन कक्ष परिचर | एस – 1 ₹ 15,000 – 47,600 | 06 |
| 4 | प्रयोगशाळा परिचर | एस – 1 ₹ 15,000 – 47,600 | 05 |
| 5 | प्रयोगशाळा सेवक | एस – 1 ₹ 15,000 – 47,600 | 02 |
| 6 | चतुर्थश्रेणी कर्मचारी | एस – 1 ₹ 15,000 – 47,600 | 03 |
| 7 | वसतिगृह सेवक | एस – 1 ₹ 15,000 – 47,600 | 11 |
| 8 | सुरक्षारक्षक | एस – 1 ₹ 15,000 – 47,600 | 07 |
| 9 | अंधारखोली परिचर | एस – 1 ₹ 15,000 – 47,600 | 03 |
| एकूण पदे | 47 | ||
◾भरती विभाग : महाराष्ट्र शासन, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई संचालनालय, वैद्यकीय शिक्षण संशोधन, मुंबई द्वारे ही भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदे : गट ड (Group D)
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000 ते 47,600 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
शैक्षणिक अर्हताः
◾जाहिरातीमधील नमूद पदांसाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिध्दी दिनांकाच्या रोजी उमेदवाराने पुढीलप्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.
अ) उमेदवार कोणत्याही शासनमान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परिक्षा [१० वी] उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (सर्व पदांकरीता सामाईक अर्हता.)
आ) न्हावी या पदाकरीता उपरोक्त (अ) मधील शैक्षणिह अर्हते सह औद्योगिक प्रशिक्षण केंद्राकडील (I.T.I.) केश कर्तनालय प्रमाणपत्र अभ्याक्रम पुर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
इ) सहाय्यक स्वयंपाकी या पदाकरीता उपरोक्त (अ) मधील शैक्षणिह अर्हते सह कमीत कमी एक वर्षाचे नोंदणीकृत व्यवसायधारकाचे स्वयंपाक करता असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
ई) प्रयोगशाळा परिचर पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) शाखा (विज्ञान) विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
उ) माळी या पदाकरीता उपरोक्त (अ) मधील शैक्षणिह अर्हते सह माळी प्रमाणपत्र,
ऊ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
◾माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हताः
तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस.एस.सी. उत्तीर्ण असलेल्या किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकीट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.
परिक्षेचे स्वरुप :
१) परिक्षा ही ऑनलाईन (Computer based Test) पध्दतीने घेण्यात येईल, परिक्षेच्या प्रश्न पत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक ०२ गुण ठेवण्यात येतील.
२) गट ड (वर्ग ४) समकक्ष पदासाठी माध्यमिक शालांत परिक्षा [एस.एस.सी.] हि कमीत कमी अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परिक्षा [एस.एस.सी.] परिक्षेच्या दर्जाच्या समान राहील, मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या [एस.एस.सी.) च्या दर्जाच्या समान राहील य लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दीक चाचणी या विषयावर प्रश्ना करीता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकुण २०० गुणांची ऑनलाईन (Computer based Test) परीक्षा घेण्यात येईल.
३) या पदांकरीता मौखिक परीक्षा (मुलाखती) घेण्यात येणार नाहीत. गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकुण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
४) परीक्षेचा निकाल (निवकसुची) तयार करतांना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रम हा नमुद निकषांच्या आधारे क्रमवार लावला जाईल.
५) परीक्षा ही Computer based Test ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र १ ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची काठिण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करणेचे (Normalization) पध्दतीने गुणांक निश्चित करुन निकाल जाहीर करणेत येईल. (Normalization) बाबत IBPS कंपनीकडून देण्यात आलेले सुत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेला आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग भरती : महत्वाची माहिती
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे.
◾पदाचे नाव : शिपाई, शवविच्छेदन अटेंडंट, शवविच्छेदन कक्ष अटेंडंट, प्रयोगशाळा अटेंडंट, प्रयोगशाळा सेवक, वसतिगृह सेवक, सुरक्षा रक्षक, डार्करूम अटेंडंट, रूम अटेंडंट/रुग्ण अटेंडंट, औषध वितरण अटेंडंट, बाह्यरुग्ण अटेंडंट, अपघात वॉर्ड अटेंडंट, सर्जिकल अटेंडंट, डार्करूम अटेंडंट, एक्स-रे अटेंडंट, रक्तपेढी अटेंडंट, रुग्ण पोर्टर, सहाय्यक स्वयंपाकी, सुरक्षा रक्षक/पालक, माळी, वॉशरमन, नाई, वाहन चालक, पॅरामेडिक, स्वयंपाकी, खोली अटेंडंट, वॉचमन, दवाखाना अटेंडंट, सर्जन सहाय्यक, व्रण उपचार, रक्तपेढी अटेंडंट, विमान चालक, नर्सिंग अटेंडंट, मिस्टर कम फिटर सुतार, कार्यशाळेतील अटेंडंट, वॉटरमन, शिंपी, दंत सहाय्यक, स्वच्छता सेवा, दासी/आया.
◾इतर आवश्यक पात्रता :
अ) उमेदवार कोणत्याही शासनमान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परिक्षा [१० वी] उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (सर्व पदांकरीता सामाईक अर्हता.)
आ) न्हावी या पदाकरीता उपरोक्त (अ) मधील शैक्षणिह अर्हते सह औद्योगिक प्रशिक्षण केंद्राकडील (I.T.I.) केश कर्तनालय प्रमाणपत्र अभ्याक्रम पुर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
इ) सहाय्यक स्वयंपाकी या पदाकरीता उपरोक्त (अ) मधील शैक्षणिह अर्हते सह कमीत कमी एक वर्षाचे नोंदणीकृत व्यवसायधारकाचे स्वयंपाक करता असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
ई) प्रयोगशाळा परिचर पदासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) शाख (विज्ञान) विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
उ) माळी या पदाकरीता उपरोक्त (अ) मधील शैक्षणिह अर्हते सह माळी प्रमाणपत्र.
ऊ) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
◾अर्ज शुल्क: खुल्या वर्गासाठी 1,000/- रुपये आणि राखीव वर्गासाठी 900/- रुपये.
◾नोकरी ठिकाण : मिरज-सांगली.
◾अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीव्दारे स्वीकारण्यात येतील.
अधिकृत जाहिरात व अर्ज लिंक :
| अधिकृत माहिती | महत्वाच्या लिंक |
|---|---|
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : ०७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.