Maharashtra Police Bharti 2025 | अर्ज भरण्यासाठी शेवटचे काही दिवस बाकी | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

राज्यभरातील विविध जिल्ह्यांच्या आस्थापनेवर 15,641 पेक्षा जास्त पोलीस शिपाई पदे भरण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. गृह विभागाच्या मान्यतेनुसार ही भरती प्रक्रिया राबवली जात असून, पोलीस खात्यात स्थिर सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या प्रत्येक पात्र उमेदवारासाठी ही उत्तम वेळ आहे. या भरतीसाठी उमेदवाराने 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. निवड झाल्यानंतर उमेदवारांना पे बँड 21,700 ते 69,100 (लेवल 3, 7वा वेतन आयोगानुसार) वेतन मिळेल. पदाचे स्वरूप कायमस्वरूपी असल्याने भविष्यातील करिअरसाठी ही संधी सुरक्षित मानली जाते. सर्व जिल्ह्यांच्या Pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

PDF सर्व जाहिराती येथे क्लीक करा
सर्व जाहिराती येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज करताना उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा व इतर अटींची सविस्तर माहिती संबंधित PDF जाहिरातीमध्ये दिलेली असल्याने ती नीट वाचणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रियेकरता पूर्णपणे ऑनलाईन पद्धत ठेवण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध झाली असल्याने उमेदवारांनी आपल्या जिल्ह्यानुसार योग्य जाहिरात पाहून अर्ज करावा.

निवड झाल्यावर उमेदवारांची नियुक्ती महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्यात करण्यात येईल. अर्जाची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025 इतकी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. भरतीसंबंधी सर्व माहिती, पीडीएफ जाहिराती आणि अर्ज लिंक अधिकृत विभागीय पोर्टलवर उपलब्ध आहेत. ही संधी तुमच्या करिअरमधील मोठा टप्पा ठरू शकते, त्यामुळे सर्व अटी तपासून अर्ज नक्की करा.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo