Maharashtra Vanvibhag Bharti 2025 : महाराष्ट्र वनविभाग, पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान कार्यालय अंतर्गत जाहिरात दिलेल्या पदांची शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता पूर्ण करीत असलेल्या पदांसाठी नेमणुक करावयाची आहे. त्या करिता पात्र इच्छुक उमेदवारांना कडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी इच्छुक व उत्सुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. वनविभाग अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, PDF जाहिरात खाली दिली आहे.
Maharashtra Vanvibhag Bharti 2025 : Maharashtra Forest Department, Pench Tiger Project Conservation Foundation Office is recruiting for the posts advertised for those who fulfill the educational and additional qualifications. Applications are invited from eligible and interested candidates for the same.
🔔 सूचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : महाराष्ट्र वनविभाग आणि पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : pdf जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 30,000/- ते 60,000/- रुपये पर्यंत निवड झालेल्या उमेदवारांना मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाइन (ई- मेल) / ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : पशुवैद्यकीय अधिकारी आणि समुदाय समन्वयक.
◾इतर आवश्यक पात्रता :
▪️Veterinary Officer (पशुवैद्यकीय अधिकारी) :
1) स्नातकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) ला प्राधान्य देण्यात येईल.
2) वन्यजीव, उपचार व हाताळण्याचा अनुभव. पशुवैद्यकीय शास्त्राच्या क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा व्यावहारिक अनुभव.
▪️समुदाय समन्व्यक (Community Coordinator) :
1) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी/पदवोत्तर B.Sc/M.Sc/MSW असणे. मराठी, इंग्रजी हिंदी बोलता व वाचता लिहिण्यास सक्षम असावे.
2) वनविभागात काम केलेले असल्याचा किमान 1 वर्षाचा अनुभव.
3) ग्राम पुनर्वसन, पुनर्वसन कार्य किंवा समुदाय सहभाग कार्यातील अनुभव, विशेषतः वनक्षेत्र किंवा वन्यजीव संवर्धन क्षेत्रात अनुभव.
4) स्थानिक समुदास, प्रशासन आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी उत्तम संवाद कौशल्य.
5) स्थानिक भाषेचे ज्ञान व ग्रामीन/वनाधारित समाजरचनेबद्यलची समज असणे फायदेशीर ठरेल.
6) व्याघ्र प्रकल्पाचा क्षेत्रात कार्य करण्याची तयारी असावी.
◾एकूण पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नागपूर.
◾या पदाकरीता मराठी व इंग्रजीचे पुरेसे ज्ञान (बाचता, लिहीणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
◾निवड झालेल्या उमेदवारास वरील तक्त्यात दर्शविलेल्या मुख्यालय ठिकाणी काम करावे लागेल.
◾पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर पदभरती (कंत्राटी पध्दतीवर) सदर पदाकरीता बायोडाटा (Resume) व अर्ज (Application) तसेच वरील प्रमाणे दर्शविलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता बाबतचे मुळ दस्ताऐवज मुलाखतीच्या वेळेस दाखविण्यात यावे.
◾नियुक्ती झालेल्या कंत्राटी पदास 24 तास सेवेकरीता तत्पर राहणे बंधनकारक राहील. मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांचे आदेशान्वये पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यक्षेत्रात कोणत्याही ठिकाणी कार्य करावे लागेल.
◾नियुक्त प्राधिकारी समितीने घेतलेला निर्णय अंतिम राहिल यांची कृपया उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 ऑक्टोबर 2025, संध्याकाळी 05:00 पर्यंत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी संचालकांचे कार्यालय, पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत (वन इमारत), सरकारी प्रेस जवळ, झिरो माईल, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४० ००१.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.