10वी व ITI उत्तीर्णांची महावितरण मध्ये भरती | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

Mahavitaran Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL) अंतर्गत सत्र 2025-2026 साठी विविध व्यवसायांकरिता 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज वेळेत सादर करावेत. ही जाहिरात कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या., संवसु विभाग यांनी प्रसिद्ध केली आहे. अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली अधिकृत PDF जाहिरात नीट वाचा. अधिकृत जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची लिंक खाली दिली आहे.

◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या., संवसु विभाग.
◾पदाचे नाव : वीजतंत्री (Electrician), तारतंत्री (Wireman), कोपा-पासा (COPA).
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी 10वी आणि ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा.)
◾अधिकृत दस्तऐवज : PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक आणि सविस्तर माहिती खाली उपलब्ध आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्याची पद्धत : अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
◾वयोमर्यादा : उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षांपर्यंत असावे. राखीव उमेदवारांना 5 वर्षांची सूट मिळेल.
◾प्रशिक्षण कालावधी : निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाईल.
◾ एकूण पदे : 49 रिक्त जागा उपलब्ध आहेत.
◾ नोकरी ठिकाण : आर्वी, जिल्हा वर्धा.
◾ अर्ज प्रक्रिया आणि तारीखा :
1) ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत : 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत.
2) अर्जाची प्रत, शैक्षणिक कागदपत्रे आणि आधारकार्ड सादर करण्याची शेवटची तारीख : 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत.
◾अर्ज सादर करण्याचा पत्ता :
कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., विभागीय कार्यालय, कदम बिल्डींग, वसंत नगर, आर्वी ता. आर्वी, जि. वर्धा.
◾अर्ज सादर करण्याची वेळ : सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.30 पर्यंत.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo