महिला व बालविकास आयुक्तालय भरती 2025 | लगेच अर्ज करा.

महिला व बालविकास आयुक्तालयांतर्गत विविध जबाबदारीच्या पदांसाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. या भरतीद्वारे एकूण 0258 पदे भरली जाणार असून ही सर्व पदे गट-ब (राजपत्रित) संवर्गातील आहेत. या माध्यमातून अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था अधिकारी, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) या पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन ठेवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत PDF जाहिरात नीट वाचून त्यानुसारच अर्ज सादर करणे आवश्यक आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

या भरतीसाठी तुम्ही फक्त ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. या भरतीचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या पदांसाठी फक्त महिला व बाल विकास विभाग तसेच ग्राम विकास विभागातील कार्यरत कर्मचारीच अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण महाराष्ट्रातील विविध कार्यालयांत होणार आहे, त्यामुळे राज्यभर काम करण्याची तयारी असणे अपेक्षित आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2025 अशी जाहीर करण्यात आली आहे. योग्य पात्रता आणि विभागीय सेवा अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करून आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा, आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून खात्री करून घ्यावी.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo