MPSC BHARTI 2025 : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता, व नाविन्यता विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र, (तांत्रिक) आणि प्राचार्य, शासकीय औद्यगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा सहायक प्रशिक्षणाची सल्लागार, गट-ब (तांत्रिक) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब या संवर्गातील एकूण 0132 पदांच्या भरतीकरीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्हताप्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची अधिकृत जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
MPSC BHARTI 2025 : As per the requisition received from the Department of Skills, Employment, Entrepreneurship and Innovation, Government of Maharashtra, applications are being invited from qualified candidates through the prescribed online mode for the recruitment of a total of 0132 posts.
MPSC BHARTI 2025 : माहिती
◾भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : MPSC सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾एकूण पदे : 0132 जागा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 47,600/- ते 1,51,100/- रुपये अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.
◾अधिकृत pdf जाहिरात, अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025 : आवश्यक माहिती :
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र, (तांत्रिक) आणि प्राचार्य, शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, गट-ब (तांत्रिक) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब या संवर्गातील.
◾इतर आवश्यक पात्रता : PDF जाहिरात वाचा.
◾अर्ज शुल्क :
▪️अराखीव (खुला) : ७१९/- रुपये.
▪️मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग : ४४९/- रुपये.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
शैक्षणिक अर्हता व अनुभव :
1.प्रस्तुत जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता तसेच अनुभव धारण करणे आवश्यक आहे.
2.अनुभवाच्या दाव्याबाबतः आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विविध स्वरुपाचे दावे करताना अथवा दावे अद्ययावत करताना प्रस्तुत जाहिरातीस अनुसरुन अनुभवाच्या दाव्यांनुसार पात्र होण्यासाठी उमेदवाराने Nature of Job :- Professional or Teaching or Administrative असे नमूद करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय, ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज स्वीकृत होऊ शकणार नाही.
3.कर्तव्ये व जबाबदाऱ्याः प्रस्तुत विषयनिहाय पदांच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्या याबाबतचा तपशील आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अधिकृत जाहिरात व अर्ज लिंक :
| अधिकृत माहिती | महत्वाच्या लिंक |
|---|---|
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
निवड प्रकिया :
1.प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून, किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलाविण्याकरिता पात्र असणार नाही.
2.जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि/अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता/अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतोस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
3.चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास, अर्हता आणि / अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही.
4.चाळणी परीक्षा घेण्यात आल्यास आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतूदीनुसार किमान पसेंटाईल अर्हतामान लागू राहील. ११.५ चाळणी परिक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी (लागू असल्यास) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.
5.चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवल मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल.
6.मुलाखतीमध्ये किमान ४१% व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल.
7.प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया मागणीपत्रानुसार मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र, किंवा प्राचार्य, शासकीय औद्यगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किवा सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, गट-ब (तांत्रिक) (राजपत्रित), महाराष्ट्र शिक्षण सेवा, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या सेवा प्रवेश नियम, २०२३ तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणा-या कार्यनियमावली / कार्यपध्दतीनुसार राबविण्यात येईल.
8.अंतिम शिफारस यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांची क्रमवारी (Ranking) आयोगाच्या दिनांक १२ सप्टेंबर, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामधील तरतुदीनुसार निश्चित करण्यात येईल.
अर्ज सादर करण्याचा कालावधी :
| अ. क्र. | तपशील | विहित कालावधी |
|---|---|---|
| 1 | अर्ज सादर करण्याची कालावधी | दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी 14:00 ते दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी 23:59 |
| 2 | ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक | दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी 23:59 |
| 3 | भारतीय स्टेट बँकेमार्फत परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक | दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी 23:59 |
| 4 | चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक | दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये |
◾ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
◾आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 आक्टोबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.