MPSC Group-C Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग उर्जा व कामगार विभाग, वित्त विभाग, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये मधील एकूण 0938 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र (गट-क) मधील रिक्त जागांवर नियुक्ती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनाकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी तयार झालेली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
MPSC Group-C Bharti 2025 : Applications have been invited online from eligible and interested candidates for appointment to vacant posts in Maharashtra (Group-C) through the Maharashtra Public Service Commission for the recruitment of a total of 0938 posts in the Industries, Energy and Labour Department, Finance Department, Ministerial Administrative Department of the Government of Maharashtra and various offices of the State Government in Maharashtra.
पदे, विभाग व वेतन
| अनु. क्र. | संवर्ग | विभाग | वेतनश्रेणी | एकूण पदे |
|---|---|---|---|---|
| 1 | उद्योग निरीक्षक | उद्योग ऊर्जा व कामगार विभाग | 35400 – 112400 रूपये | 09 |
| 2 | तांत्रिक सहाय्यक | वित्त विभाग | 29200 – 92300 रुपये | 04 |
| 3 | कर सहाय्यक | वित्त विभाग | 25500 – 81100 रूपये | 73 |
| 4 | लिपिक-टंकलेखक | मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये | 19900 – 63200 रुपये | 152 |
| एकूण पदे | 238 | |||
एकूण पदे व इतर माहिती
◾भरती विभाग : महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾एकूण पदे : 0938 जागा भरल्या जात आहेत.
◾पदाचे नाव: उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर व इतर पात्रता. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 29,200 ते 92,300 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 55 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾नोकरी ठिकाण : महाराष्ट्र.
◾प्रस्तुत जाहिरातीमध्ये परीक्षेसंदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याची पध्दत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा योजना, अभ्यासक्रम इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशिलासाठी आयोगाच्या https://nguc.gov.in या संकेतस्थळावरील “उमेदवारांकरीता माहिती” विभागातील सूचना” अंतर्गत सर्वसाधारण सूचना तसेच “परीक्षा” या सदराखालील “परीक्षा योजना” विभागालोल महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा मध्ये तसेच पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम उमेदवारांकरीता माहिती” विभागातील “परीक्षा अंतर्गत “अभ्यासक्रम ” येथे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीचे कृपया अवलोकन करावे.
◾सदर जाहिरात आयोगाच्या htps://mpsc.gov.in तसेच https://nagacoaline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
परीक्षा शुल्काचा भरण्याच्या दोन पद्धती
1) ऑनलाईन पध्दतीने :
(१) भारतीय स्टेट बैंक तसेच प्रणालीद्वारे उपलब्ध करुन दिलेल्या कोणत्याही एका पेमेंट गेटवेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेटबँकिंगद्वारे परीक्षा शुल्क अदा करता येईल.
(२) परीक्षा शुल्काचा भरणा करताना बँक खात्यामधून परीक्षा शुल्काच्या रकमेची वजावट झाल्यावर परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे झाला (Payment Successful) असल्याचा संदेश आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या पृष्ठावर प्रदर्शित झाल्याशिवाय व परीक्षा शुल्काची पावती तयार झाल्याशिवाय संकेतस्थळावरील संबंधित पृष्ठावरून आणि/अथवा खात्यातून लॉगआऊट होऊ नये.
(३) परीक्षा शुल्काचा भरणा केल्यानंतर उमेदवाराला त्याच्या प्रोफाईलमध्ये परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी झाला आहे किंवा कसे, याची स्थितो (status) लगेचच अवगत होईल. खात्यातून Logout होण्यापूर्वी परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बँकेकडून व्यवहार (Transaction) पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी उमेदवाराची आहे.
(४) कोणत्याही कारणामुळे विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे करणे शक्य न झाल्यास अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकानंतर दोन दिवसापर्यंत परीक्षाशुल्काचा भरणा ऑफलाईन पद्धतीने करण्याकरीता चलनाची प्रत घेता येईल.
2) ऑफलाईन पध्दतीने : चलनाद्वारे
(१) चलनाद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा करण्याचा विकल्प निवडल्यास उपलब्ध होणारी चलनाची प्रत घेऊन भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत बँकेच्या कार्यालयीन वेळेत विहित अंतिम दिनांकापूर्वी परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल, तथापि, चलनाची प्रत घेणे व बँकेत शुल्क जमा करणे, यामध्ये किमान तीन तासांचे कालावधी राहील, याची दक्षता घ्यावी.
(२) परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी न झाल्यास पुन्हा शुल्क भरण्याची अथवा चलन येण्याबाबतची कार्यवाही प्रस्तुत जाहिरातीच्या/अधिसूचनेच्या अनुषंगाने विहित दिनांकापूर्वीच करणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणास्तव व्यवहार अयशस्वी ठरल्यास यासंदर्भातील तक्रारीची आयोगाकडून दखल घेतली जाणार नाही.
(३) विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित भरतीप्रक्रियेकरीता विचार केला जाणार नाही, यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचनांमधील संबंधित तरतुदींचे अवलोकन करणे उमेदवारांच्या हिताचे राहील.
परीक्षेचे टप्पे
| अनु. क्र. | संवर्ग | टप्पे | संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण | संयुक्त मुख्य परीक्षेचे गुण |
|---|---|---|---|---|
| 1 | उद्योग निरीक्षक | संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा | 100 | 400 |
| 2 | तांत्रिक सहाय्यक | |||
| 3 | कर सहाय्यक | |||
| 4 | लिपिक-टंकलेखक |
निवड प्रक्रिया
▪️जाहिरातीमध्ये नमूद अर्हता/पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
▪️सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणा-या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवे सुधारण्यात येणाऱ्या कार्यनियमावलीतील तरतुदींनुसार राबविण्यात येईल :-
(१) उद्योग संचालनालयातील उद्योग निरीक्षक, गट-क (सेवाप्रवेश) नियम, २०२१
(२) विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क (सेवाप्रवेश) नियम २०१३.
(३) वित्त विभागातील तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय (सेवाप्रवेश) नियम, २००१.
(४) शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक, गट-क (सेवाप्रवेश) नियम २०१७.
पूर्व परीक्षेसाठी अर्ज कसा कराल?
(1) आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पद्धतीने नोंदणी केली नसल्यास, नोंदणी करून खाते (Profile) तयार करणे.
(2) खाते तयार केलेले असल्यास व ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास, अद्ययावत करणे.
(3) आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरील उमेदवाराच्या खात्याची केवायसी (KYC) करण्याकरीता आयोगाच्या संकेतस्थळावरील विहित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही पूर्ण करण्याकरीता स्वतंत्रपणे कालावधी उपलब्ध करून देण्यात येईल. सदर कालावधीमध्ये खात्याची केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य राहील.
(4) विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने पुढीलप्रमाणे लागू असेल त्यानुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करणे.
(5) परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.
(6) जिल्हा केंद्र निवड करणे.
(7) संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरुन, अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आयोगाच्या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गट-व (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
(8) संयुक्त पूर्व परीक्षेकरीता भरावयाच्या अराखीव व आरक्षित एकूण पदसंख्येच्या आधारे, मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करुन, सामाईक पूर्व परीक्षेमधील उमेदवारांच्या गुणांच्या आधारे गट-क सेवेकरीता एकत्रित निकाल जाहीर करण्यात येईल.
हॉलतिकीट
1) परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळाचर (https://mpsconline.gov.in) उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे परीक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे ७ दिवस अगोदर उपलब्ध करुन देण्यात येईल, त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करुन घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
2) परीक्षेच्या वेळी उमेदवाराने स्वतःचे प्रवेशप्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय, परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर उमेदवाराला त्याच्या आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येईल.
3) याबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी एक सप्ताह अगोदर प्रसिद्ध करण्यात येईल.
4) परीक्षेच्या दिनांकापूर्वी ३ दिवस अगोदर प्रवेश प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याच्या आवश्यक पुराव्यासह आयोगाच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा.
5) परीक्षेच्यावेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
6) आधार कार्डच्या ऐवजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड केलेले ई-आधार सादर करणा-या उमेदवारांच्या बाबतीत ई-
7) आधार वर उमेदवाराचे नाव, पत्ता, लिग, फोटो, जन्मदिनांक या तपशीलासह आधार निर्मितीचा दिनांक (Date of Aadhaar generation) व आधार डाऊनलोड केल्याचा दिनांक असल्यासच तसेच सुस्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंट मध्ये आधार डाऊनलोड केले असल्यासच ई-आधार वैध मानण्यात येईल.
8) नावांमध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत), नावांत बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावांत बदल झाल्यासंबंधीचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्यावेळी सादर करणे आवश्यक आहे.
अधिकृत जाहिरात व अर्ज लिंक
| अधिकृत माहिती | महत्वाच्या लिंक |
|---|---|
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.