नगरपंचायत भरती 2025 | मासिक वेतन : 35,000 रुपये | Nagarpanchayat Bharti 2025

Nagarpanchayat Bharti 2025 : नगरपंचायतच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेचे अंबलबजावणी करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील (CLTC Cell) मंजुर असलेल्या पदाकरिता नेमणुक करणेसाठी दिनांक ०९/१०/२०२५ पासून दिनांक १९/१०/२०२५ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत खालील अर्हता धारण करणाऱ्या व पात्र उमेदवारांकडून मुलाखतीकरिता आवश्यक कागदपत्रांसह सील बंद लिफाफ्यात (पाकिटात) हार्ड कॉपी मध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. Pdf जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

Applications are being invited for appointment to the approved posts in the City Level Technical Cell (CLTC Cell) under the Pradhan Mantri Awas Yojana to implement the Pradhan Mantri Awas Yojana on behalf of the Nagar Panchayat.

भरती बद्दलची संक्षिप्त माहिती

पदाचे नाव एकूण रिक्त पदे वेतन / मानधन अर्ज करण्याची पद्धत
स्थापत्य अभियंता तज्ञ 01 दरमहा ₹35,000/- ऑफलाईन

मासिक पगार व अधिक माहिती

◾भरती विभाग : नगरपंचायत द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 35,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

आवश्यक माहिती

1) धडगांव-वडफळ्या-रोषमाळ बु.नगर पंचायतच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेचे अंबलबजावणी करण्यासाठी, मा. मुख्य अभियंता २ तथा राज्यस्तरीय समन्वय अधिकारी, (रा.सु.अ.) प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) व प्रधानमंत्री आवास योजना २.० (शहरी) म्हाडा यांचे पत्र नुसार भरती करण्यात येत आहे.
2) प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील (CLTC Cell) मंजुर असलेल्या स्थापत्य अभियंता तज्ञ (Civil Engineer) या १ पदाकरिता निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने नेमणुक करणेसाठी दिनांक ०९/१०/२०२५ पासून दिनांक १९/१०/२०२५ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत खालील अर्हता धारण करणाऱ्या व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवितात येत आहेत.
3) मुलाखतीकरिता आवश्यक कागदपत्रांसह सील बंद लिफाफ्यात (पाकिटात) हार्ड कॉपी मध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. विहित मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच ई-मेल द्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

नियुक्ती कालावधी

1) सदर कामी एस.एस.सी पासून पदवी/ पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता व अनुभवावर आधारित गुणांकन ठेवले असून त्यानुसार चाळणी पद्धतीने यादी प्रसिद्ध करून यादीतील पात्र उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलविण्यात येईल.
2) सदर पदाचा कालावधी प्रथम नियुक्तीच्या दिनांका पासून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ठेवण्यात येईल व योजनेस अनुसरून शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार तसेच उमेदवाराच्या कामकाजानुसार पुढील नियुक्तीचा निर्णय घेण्यात येईल. सदर प्रक्रियेत बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार नगरपंचायतीकडे राखून ठेवलेले आहेत.
3) या कामी म्हाडा व शासन यांचेकडून वेळोवेळी प्राप्त होणारे निर्देश बंधनकारक राहतील. सबब त्यासाठी कारणे दिली जाणार नाही. अर्जाचा नमुना धडगांव-वडफळ्या रोषमाळ (बु.) नगर पंचायत मधील बांधकाम विभागात कार्यलयीन वेळेत उपलब्ध आहे.

आवश्यक पात्रता

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव : स्थापत्य अभियंता तज्ञ.
◾इतर आवश्यक पात्रता :
१) Graduate in Civil Engineering from statutory university
२) At least 2 years experience in procurement design and supervision of infrastructure works.
३) Ability to assist Urban Local Body to set standards and procedures for insuring quality and monitoring compliances.
४) Prior experience as municipal engineer/experience in PMAY or any other Govt. Housing Scheme will be an added advantage. ५) Fluency in local language essential.
◾एकूण पदे : 01 जागा.
◾नोकरी ठिकाण : धडगांव, जिल्हा नंदुरबार.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 19 ऑक्टोबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : नगरपंचायत धडगांव-वडफळ्या-रोषमाळ बु. ता. अक्राणी जि. नंदुरबार.
◾सदर कामी एस.एस.सी पासून पदवी/ पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता व अनुभवावर आधारित गुणांकन ठेवले असून त्यानुसार चाळणी पद्धतीने यादी प्रसिद्ध करून यादीतील पात्र उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलविण्यात येईल.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

अधिकृत जाहिरात व वेबसाईट

अधिकृत माहिती महत्वाच्या लिंक
PDF जाहिरात येथे क्लिक करा
वेबसाईट येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo