नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 | Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2025

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2025 : जे उमेदवार मुंबई मध्ये नोकरी शोधत आहेत त्यांना चांगली संधी आहे. नवी मुंबई महानगरपालिका द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे. शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता रिक्त असलेल्या पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी या पदाकरीता इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीसाठीची pdf जाहिरात NMMC द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2025 : Advertisement has been published by Navi Mumbai Municipal Corporation. Advertisement has been published for the recruitment of vacant posts for Urban Health Promotion Center under the 15th Finance Commission. For this, interested and eligible candidates for this post have to submit applications in the prescribed format.

पदाचे नाव, मासिक वेतन व प्रवर्ग

पदाचे नाव मासिक मानधन टोटल
स्टाफ नर्स (स्त्री) ₹ 20,000/- एकूण 41
स्टाफ नर्स (पुरुष) ₹ 20,000/- एकूण 03

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा

◾भरती विभाग : नवी मुंबई द्वारे जाहिरात प्रसिद्ध.
◾पदे : स्टाफ नर्स.
◾शैक्षणिक पात्रता :
1) 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किंवा B.Sc. Nursing.
2) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी बंधनकारक.
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 20,000 रुपये मासिक मानधन दिले जाणार आहे.
◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी फक्त ऑफलाईन पद्धतीनें अर्ज केला जाऊ शकतो.
◾वयोमर्यादा :
1) आराखिव : 38 वर्ष.
2) राखीव : 43 वर्ष.
◾एकूण पदे : एकूण 43 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾नोकरी ठिकाण : नवी मुंबई महानगरपालिका.

अर्हता

▪️शैक्षणिक अर्हते बाबतचा सविस्तर व अचूक तपशिल नोंद करावा.
▪️अर्ज सादर करावयाच्या शेवटच्या तारखेला उमेदवाराकडे जाहिराती मध्ये नमुद केलेली शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे.
▪️अर्ज भरत असताना अंतिम वर्षाच्या मिळालेले गुण व गुणांची टक्केवारी अचूकपणे नमूद करावी. ग्रेड अथवा अन्य श्रेणी नमूद न करता गुण व गुणांची टक्केवारी नमूद करणे अनिवार्य आहे. प्रमाणपत्रात नमूद गुण व गुणांची टक्केवारी अर्जात नमुद टक्केवारी न जुळल्यास असे अर्ज नामंजूर करण्यात येतील.
▪️उमेदवारांची अर्जामध्ये नमुद माहितीनुसार अर्जाची छाननी करण्यात येईल.
▪️पदाकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता/पात्रता ही शासकीय मान्यता प्राप्त विद्यापिठातूनच प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

अनुभव

1)शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचा शासकीय, निमशासकीय व खाजगी अनुभव ग्राहय धरण्यात येईल. त्यानुसार शैक्षणिक अर्हता धारण करण्यापुर्वीच्या अनुभवाची नोंद करण्यात येऊ नये. त्या अनुभवाची परिगणना करण्यात येणार नाही.
2)अनुभवाचा तपशिल नमुद करीत असताना ज्या शासकीय, निम शासकीय व खाजगी कार्यालयाचे अनुभव प्रमाणपत्र प्राप्त आहे अशाच शासकीय, निम शासकीय व खाजगी कार्यालयाचा तपशिल फॉर्ममध्ये नमुद करावा. अनुभव प्रमाणपत्र नसल्यास सदरचा अनुभव ग्राहय धरण्यात येणार नाही. अनुभव प्रमाणपत्रामध्ये अनुभवाचा कालावधी सुस्पष्टपणे नमूद असावा.
3)अनुभव प्रमाणपत्रामध्ये तपशिल नमुद करताना रुजू दिनांक व कार्यमुक्तीचा दिनांक सूचकपणे नमूद करावा. सदर कालावधी अनुभव प्रमाणपत्रानुसारच नोंदविण्याची दक्षता घ्यावी. यामध्ये तफावत आढळल्यास सदर प्रमाणपत्र अवैध ठरविले जाईल.
4) ज्या पदाकरीता अर्ज केला आहे त्या पदाकरीता आवश्यक असलेला अनुभवच ग्राहय धरण्यात येईल. या व्यतिरिक्त इतर अनुभव असल्यास असा अनुभव विचारात घेतला जाणार नाही.
5) संगणक अर्हता : MSCIT प्रमाणपत्र धारण करीत असल्याचा तपशील नमूद करावा.

अर्ज कसा कराल?

1) सर्व उमेदवारांनी जाहिरात मध्ये नमुद अर्जा मध्ये अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे.
2) अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्दयाची माहिती अचूक भरावी. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
3) स्टाफ नर्स पदाकरीता पूर्ण भरलेला अर्ज व (त्र) मधील मुद्दा क्र. 5,6,7 नुसार सर्व कागदपत्रे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नर्मुमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई- 400614 येथे (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) प्रत्यक्षात (By Hand) व कुरीअरने दि. 15/10/2025 ते दि.4/11/2025 पर्यंत सादर करण्यात यावेत. दिलेल्या मुदती नंतर सादर करण्यात येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. (टपालाने/कुरीयरने सादर करण्यात आलेले अर्ज विहित कालावधीत या कार्यालयात पोहोचतील याची दक्षता घ्यावी. उशीरा प्राप्त अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.)

आवश्यक कागदपत्रे

a) वयाचा पुरावा (10) वी बोर्ड प्रमाणपत्र)
b) शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रिका व प्रमाणपत्र
) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
c) शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र
d) राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र
e) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
f) नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
g) आधारकार्ड
h) पॅनकार्ड
i) सध्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
j) अर्जदार विवाहीत असल्यास विवाह नोंदणी k)प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
l) लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
m) फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमी पत्र

अधिकृत जाहिरात व वेबसाईट

अधिकृत माहिती महत्वाच्या लिंक
PDF जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 04 नोव्हेंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, एनएमएमपी मुख्यालय, प्लॉट क्रमांक १, से. १५ अ, किले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नियम व अटी

1) सदर पदभरती प्रक्रियेबाबतच्या सर्व आवश्यक सुचना व माहिती आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरच वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. या करीता उमदेवारांनी nmmc.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन माहिती प्राप्त करुन घेणे अनिवार्य राहील. पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही.
2) जाहिरातीत नमुद केलेली पदे ही पूर्णतः कंत्राटी स्वरुपाची असून ती राज्य शासनाची नियमित पदे नाहीत. या पदांचा राज्य शासनाच्या पदांशी काहीही संबंध नसून उमेदवार राज्य शासनाच्या नियमित पदावर समायोजन करण्याची मागणी करु शकणार नाही.
3) जाहिरातीत नमुद केलेले पदाचे वेतन हे एकत्रित मानधन आहे.
4) निवड झालेल्या उमेदवारांना पदे रिक्त असलेल्या शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल, याची नोंद घ्यावी. नियुक्ती आदेश दिल्यानंतर 7 दिवसांच्या आत नियुक्तीचे ठिकाणी रुजू होणे बंधनकारक राहील.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo