आरोग्य क्षेत्रात नोकरी शोधताय? जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आरोग्य विभाग, जिल्हा परिषद द्वारे विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, लेखापाल, कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम सहाय्यक आणि इतर काही पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक 12वी, पदवी, डिप्लोमा किंवा संबंधित व्यावसायिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.
◾भरती प्रक्रिया जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत पार पडत आहे.
◾या भरतीत आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, लेखापाल, कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम सहाय्यक, समाज कार्यकर्ता, कार्यक्रम सहाय्यक (सांख्यिकी) आणि इतर काही पदांचा समावेश आहे.
◾या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे 12वी, पदवी किंवा डिप्लोमा अशी शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. अधिक तपशीलासाठी अधिकृत PDF जाहिरात तपासणे गरजेचे आहे.
◾निवड झाल्यानंतर उमेदवारांना दरमहा सुमारे 20,000 ते 70,000 रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे.
◾ PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾या भरतीसाठी विहित सामाजिक प्रवर्गातील इच्छुक पात्र उमेदृवारांनी दि. 24 / 10 / 2025 ते दिनांक 4 / 11 / 2025 या कालावधीमध्ये सकाळी 10.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत (सुदृट्टीचे दिवस वगळून) संकेतस्थळावरील जाहिरातीत नमुद केलेल्या कागदपत्रासह व संकेतस्थळावरील अर्जाचा नमुना सुचित केलेप्रमाणे भरणेचा आहे.
◾सुस्पष्ट भरलेले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी मु.पो ओरोस तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांचे नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM, SINDHUDURG) व पदाचे नावाचा स्पष्ट उल्लेख करुन अर्ज सादर करावेत.
◾अर्ज शुल्क : सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु.150/- इतके शुल्क आकारणेत येत आहे. अर्जाचे शुल्क हे डिडि स्वरुपात किंवा ऑनलाईन पहधतीने (फोन पे। जीपे/ युपीआय / इंटरनेट बँकिंग / मोबाईल बँकिंग) स्विकारणेत येणार आहे.
◾पदभरतीची विस्तृत जाहिरात व अर्जाचा नमुना जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गचे संकेतस्थळावर www.sindhudurg.nic.in प्रसिद्ध आहे.