आरोग्य विभाग भरती 2025 | नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी | NHM Bharti 2025

NHM Bharti 2025 : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, राष्ट्रीय आरोग्य अभियान, अंतर्गत आशा स्वंयसेविका योजना, कडून खालील पदाकरिता कामावर आधारित मोबदला पध्दतीने नेमणूक करावयाची आहे. तरी, इच्छूक उमेदवारांकडून गटप्रवर्तक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. आरोग्य विभागात रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हास्तरीय निवड समिती व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

NHM Bharti 2025 : The Health Department, Zilla Parishad, National Health Mission, under ASHA Volunteer Scheme, is to make appointments for the following posts on a performance-based remuneration basis. However, applications are being invited from interested candidates for the post of Group Promoter.

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा रिक्त पदे एकत्रित मानधन
गटप्रवर्तक पदवीधर उत्तीर्ण 21 ते 38 वर्षे 1 ₹8,375/-

भरती प्रकार, नोकरी ठिकाण व इतर

◾भरती विभाग : जिल्हास्तरीय निवड समिती व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : गटप्रवर्तक.
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 21 ते 38 वर्षे.
◾इतर आवश्यक पात्रता : किमान पदवीधर, (उच्चतम शैक्षणिक पात्रता धारकास प्राधान्य MS-CIT, मराठी टायपिंग (३० शब्द प्रतिमिनिट) व इंग्रजी टायपिंग (४० शब्द प्रतिमिनिट), Word or Excel अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य.
◾नोकरी ठिकाण : पालघर.
◾उच्च शैक्षणिक पात्रता व अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
◾उमेदवारांनी अर्जामध्ये भरावयाची माहिती पुढीलप्रमाणे – अर्ज केलेल्या पदाचे नाव, ठळक अक्षरात स्वतःचे संपूर्ण नाव, अर्जदाराचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक / भ्रमणध्वनी क्रमांक (अनिवार्य), ई-मेल, कामाचा अनुभव-काम केलेली संस्था-एकूण कालावधी, शैक्षणिक अर्हतेचा संपूर्ण तपशील अभ्यासक्रमाचे नाव, संस्था, विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण झाल्याचे वर्ष, गुणांची टक्केवारी, इतर शैक्षणिक अर्हता.
◾मुलाखतीसाठी कोणताही प्रवास खर्च अथवा भत्ता देण्यात येणार नाही.
◾सदयस्थितीमध्ये आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक म्हणून कार्यरत असलेल्या महिलांना प्राधान्य.

नियम आणि अटी

◾पद भरती व अंतिम निवड यादी करण्याचे अधिकार जिल्हा निवड समितीला राहतील.
◾दोनपेक्षा अधिक हयात मुल असणाऱ्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पदावर यापुढे निवड करण्यात येणार नाही. याकरीता लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अर्जासोबत दिलेल्या नमुन्यानुसार सादर करावे.
◾सविस्तर जाहिरात पात्र/अपात्र उमेदवारांची मादी, निवड/प्रतिक्षा यादी व पदभरती प्रक्रियेबाबतची सर्व माहिती/सुचना https://www.zppalghar.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल याबाबत अर्जदारास कुठलाही स्वतंत्र पत्र व्यवहार केला जाणार नाही.
◾नियुक्ती आदेश देण्यापुर्वी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राची सर्व मुळ कागदपत्र निवड समिती मार्फत पडताळणी करुन सादर करण्यात आलेली कागदपत्रे चुकीची आढळल्यास उमेदवारांना निवड प्रक्रियेतुन बाद करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
◾सदर जाहिरातीस अनुसरून ज्या उमेदवारांचे अर्ज विहित मुदतीत प्राप्त होतील केवळ अश्याच उमेदवारांचे अर्ज विचारात घेतले जातील. अन्य कोणत्याही संदर्भातील यापुर्वी या कार्यालयास प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
◾अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचुक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.
◾भरती प्रक्रिया स्थगित करणे/रद्द करणे/पदभरती प्रक्रियेत बदल करण्याचे सर्व अधिकार मा. अध्यक्ष निवड समिती तथा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पालघर यांनी राखुन ठेवले आहेत. याबाबत समेदवाराम कोणताही दावा करता येणार नाही.
◾प्राप्त झालेल्या अर्जावरुन गुषांकनानुसार मेरीट लिस्ट तयार करण्यात मईल. सदर मेरीटलिस्ट जिल्हा परिषदच्या https://zppalghar.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. उमेदवारांना सदरबाबत आक्षेप असल्यास ते सादर करण्याकरिता ०२ दिवसाची मुदत देण्यात येईल. आक्षेपासोबत त्यांच्या पृष्ठमर्थ मोग्य पुरावे सादर करण्यास सुचित करणेस येईल अशा प्रकारे प्राप्त आक्षेपांचे निराकरण करुन त्यानुसार अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल व ती जिल्हा परिषद पालघर या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
◾अर्जदार हा संबंधीत पदासाठी शारिरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच शासकीय कर्मचारी यांच्यावर पूर्वीच्या शासकीय कर्मचारी कार्यकाळात कुठल्याही स्वरुपाचे प्रशासकीय व वित्तीय कार्यवाही, दंडात्मक कार्यवाही किंवा फौजदारी अथवा इतर कुठल्याही प्रकारचे गंभीर गुन्हयाची नोंद नसावी किंवा झालेली नसावी.
◾विहित पात्रता धारण न करणान्या उमेदवारांचे अर्ज, विहित नमुन्यात नसलेले किंवा योग्य प्रकारे न केलेले अर्ज, मजकुर अपूर्ण किंवा चुकीचा भरलेला अर्ज, खाडाखोड केलेला अर्ज, स्वाक्षरी नसलेले, आवश्यक गुणपत्रक्ांच्या व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती नसलेले अर्ज अगर तत्सम माहिती योग्य रित्या न दर्शविलेले अर्ज, लहान कुंटुंबाचे प्रतिज्ञापत्र अपूर्ण भरलेल व न जोडलेले अर्ज इत्यादी प्रकारे सादर केलेल्या अर्जदारांना अपात्र ठरविण्यात येईल याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.

अर्ज कसा कराल?

तुम्हाला अर्ज करू करू हा प्रश्न पडल आहे का? उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह आपले अर्ज अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर यांच्या नावे दिनांक 13 ऑक्टोंबर 2025 ते दिनांक 24 ऑक्टोंबर 2025 (सुटटी चे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, १113 ते 116 पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नविन जिल्हा परिषद इमारत, पालघर बोइसर रोड, कोळगाव, येथे अर्ज सादर करावे. दिनांक 24 ऑक्टोंबर 2025 नंतर पर्यंत सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस बगळून पोस्टाद्वारे, कुरिअर अथवा प्रत्यक्षात (By Hand) सादर करावेत. इतर कोणत्याही पध्दतीने (ऑनलाईन, ई-मेल) आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची उमेदवाराने नोंद घ्यावी. ठरवुन दिलेल्या दिनांकानंतर अर्ज कुठल्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही. तसेच पोस्टाद्वारे शेवटच्या तारखेनंतर प्राप्त अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचा.

अधिकृत जाहिरात व वेबसाईट

अधिकृत माहिती महत्वाच्या लिंक
PDF जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 24 ऑक्टोबर 2025, संध्याकाळी 06:15 पर्यंत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, पालघर आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पालघर.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo