Sainik Kallyan Vibhag Maharashtra Bharti 2025 : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सरळसेवेची पदे भरण्यासाठी लिपिक टंकलेखक गट “क” या पदाकरीता अटींची पुर्तता करणाऱ्या फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Sainik Kallyan Vibhag Maharashtra Bharti 2025 : Applications are invited online from only ex-servicemen candidates who fulfill the conditions for the post of Clerk Typist Group "C" to fill the direct service posts in the Soldier Welfare Department and the District Soldier Welfare Offices under the jurisdiction of the Department.
एकूण पदे व नोकरी ठिकाण
| पदाचे नाव | एकूण पदे | नोकरी ठिकाण |
|---|---|---|
| लिपिक टंकलेखक (गट-क) | 72 | पुणे |
अर्ज पद्धती, वयोमर्याद व इतर माहिती
◾भरती विभाग : सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी. (Government Job)
◾एकूण पदे : या भरती मध्ये 072 पदे भरली जात आहेत.
◾पदे : लिपिक टंकलेखक (गट-क).
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 19,900 ते 63,200 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
◾वयोमर्यादा : 45 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾आवश्यक पात्रता : अर्ज फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾इतर पात्रता :
(अ) सशस्त्र दलामध्ये ज्यांनी १५ वर्षाहून कमी नाही इतकी सेवा बजावली असेल.
(ब) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा वा तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील.
(क) मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान ३० शब्द असल्याचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ज्याच्या जवळ असेल.
अर्ज करण्याची पध्दत :
(एक) ऑनलाईन अर्ज प्रणालीवर उमेदवाराने नोंदणी (Registration) करणे.
(दोन) विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे.
(तीन) परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.
परीक्षेचे स्वरुप
TCS या कंपनीव्दारे ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या स्वरुपात असेल. प्रत्येक प्रश्नास एकूण (१०० प्रश्न) जास्तीत जास्त २ गुण ठेवण्यात येतील. माध्यमिक शाळा स्तरावरील मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकूण २०० गुणाची परीक्षा असेल. नमूद केलेल्या पदांकरीता जे उमेदवार लेखी परिक्षेत एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करतील अशाच उमेदवारांचा गुणवत्ता यादीत समावेश करण्यात येईल.
परीक्षा शुल्क
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| अराखीव (खुला) | ₹1000 |
| मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक | ₹900 |
हॉलतिकीट
प्रस्तुत परीक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे ०७ दिवस अगोदर उमेदवारास प्रवेशप्रमाणपत्र (Hall Ticket) उमेदवाराच्या लॉग-इन आयडीव्दारे वरील नमूद संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येईल. यास्तव उमेदवाराने स्वताःचे प्रोफाईलवर लॉग-इन करुन प्रवेशप्रमाणपत्र पहाने आवश्यक आहे. या साठी उमेदवाराशी वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही. उमेदवाराने ऑनलाईनव्दारे भरलेले अर्ज (Application Form) व प्रवेशप्रमाणपत्र (Hall Ticket) ची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करुन घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. संभाव्य बदला बाबत वेळोवेळी सैनिक कल्याण विभागाच्या संकेत स्थळावर माहिती प्रसारित केली जाईल.
आवश्यक कागदपत्र
1) परीक्षेस येतेवेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, माजी सैनिक ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसेन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
2) परीक्षा कक्षात, परीक्षा केंद्राच्या परिसरात लेखी परीक्षेच्या वेळी मोबाईल फोन, गणक यंत्र (कॅलक्यूलेटर) अथवा इतर कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साधन आणण्यास व वापरण्यास सक्त मनाई आहे.
3) ऑनलाईन अर्ज अचूक भरण्याची जबाबदारी अर्जदार यांची राहील. त्या अनुषंगाने कोणतीही तक्रार नंतर विचारात घेतली जाणार नाही. अपात्र अर्जदारांना स्वतंत्ररित्या कळविले जाणार नाही. उमेदवारांना लेखी परिक्षेसाठी स्वखर्चाने हजर रहावे लागेल.
4) उमेदवारांची लेखी परिक्षा त्यांचे प्रवेशप्रमाणपत्रा मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी घेण्यात येईल. लेखी परिक्षेअंती उमेदवारांचे प्राप्त गुण, जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता व ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती यांच्या आधारे मूळ कागदपत्रे पडताळणी करण्याकरीता अंतरिम स्वरुपात यादी जाहीर करण्यात येईल. ज्या उमेदवारांची जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता मुळ कागदपत्रांच्या आधारे परिपूर्ण सिध्द होईल अशाच उमेदवारांचा विचार भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याकरीता करण्यात येईल.
इतर माहिती
(एक) अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील.
(दोन) अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ :- www.mahasainik.maharashtra.gov.in येथे जाऊन (Resources Tab —> Recruitment tab मध्ये लिंक उपलब्ध केली आहे.
(तीन) वरील संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती अधिकृत समजण्यात येईल.
(चार) अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतील परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
(पाच) अर्ज सादर करण्याचा कालावधी : दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून दिनांक ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी २३.५९ वाजेपर्यंत. त्यानंतर सदर वेबलिंक बंद होईल.
अधिकृत जाहिरात व अर्ज लिंक
| अधिकृत माहिती | महत्वाच्या लिंक |
|---|---|
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 05 नोव्हेंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.