Government Job : स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे तब्बल 07565 पदांची भरती सुरू | SSC Delhi Police Bharti 2025

SSC Delhi Police Bharti 2025 : तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर ही मोठी संधी आहे. कर्मचारी निवड आयोग द्वारे मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. दिल्ली पोलिस आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या द्वारे दिल्ली पोलिसात रिक्त असलेल्या कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह) पुरुष आणि महिला भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. तब्बल 07565 पदे भरली जात आहेत. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली उपलब्ध आहे.

SSC Delhi Police Bharti 2025 : Delhi Police and Staff Selection Commission have published an advertisement for the recruitment of Constable (Executive) Male and Female vacancies in Delhi Police. A total of 07565 posts are being filled. The vacant posts in the advertisement, other necessary information about it, pdf advertisement and online application link are available below.

पदाचे नाव व आरक्षण नुसार जागा

अ. क्र. पदाचे नाव सर्वसाधारण (UR) EWS OBC SC ST एकूण
1 कॉन्स्टेबल (पुरुष) 1914 456 967 729 342 4408
2 कॉन्स्टेबल (पुरुष) [माजी सैनिक – इतर] 107 26 54 62 36 285
3 कॉन्स्टेबल (पुरुष) [माजी सैनिक – कमांडो] 106 25 56 138 51 376
4 कॉन्स्टेबल (महिला) 1047 249 531 457 212 2496
एकूण पदे 3174 756 1608 1386 641 7565

शैक्षणिक पात्रता व इतर पात्रता

1) मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+2 (बारावी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) खालील उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रतेमध्ये सवलत देऊन 11वी उत्तीर्ण देखील ग्राह्य धरली जाईल:
a)कार्यरत, सेवानिवृत्त किंवा मृत दिल्ली पोलीस कर्मचारी/मल्टी-टास्किंग स्टाफ यांच्या मुलगा/मुलींसाठी.
b)बँड्समन, बग्लर्स, माउंटेड कॉन्स्टेबल्स, चालक, डिस्पॅच रायडर्स इत्यादी (फक्त दिल्ली पोलिसांमधील) उमेदवारांसाठी.
3) पुरुष उमेदवारांकडे LMV (मोटरसायकल किंवा कार) साठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे, जे PE&MT च्या तारखेपर्यंत वैध असावे. Learner License (शिकाऊ परवाना) ग्राह्य धरला जाणार नाही.
4) ज्यांच्याकडे निश्चित तारखेपर्यंत आवश्यक शैक्षणिक पात्रता नसेल, ते उमेदवार पात्र मानले जाणार नाहीत आणि त्यांनी अर्ज करू नये.

वयोमर्यादा व मासिक वेतन

◾भरती विभाग : कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : तुम्ही जर सरकारी नोकरी (Government Jobs 2025) मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे.
◾भरती पदाचे नाव : या भरती मध्ये पोलीस कॉन्स्टेबल ही पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 21,700 ते 69,100 रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अर्ज पद्धती : तुम्ही उत्सुक असाल तर ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
◾वयोमर्यादा : या भरतीसाठी 18 ते 25 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾नोकरी ठिकाण : दिल्ली.
◾उमेदवाराने आपले नाव आणि जन्मतारीख मॅट्रिक्युलेशनच्या माध्यमिक प्रमाणपत्रात नमूद केल्याप्रमाणे काटेकोरपणे लिहावी. जर परीक्षेच्या ठिकाणी प्रवेश घेताना जन्मतारखेत काही फरक आढळला तर त्याला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.

निवड प्रक्रिया : SSC Delhi Police Bharti 2025

कॉम्प्युटर ऑनलाइन परीक्षा

संगणक आधारित परीक्षेत 100 गुणांसह 100 प्रश्न असलेला एक पेपर असेल.

भाग विषय प्रश्नसंख्या एकूण गुण वेळ
A सामान्य ज्ञान / चालू घडामोडी 50 50 90 मिनिटे
B रीझनिंग 25 25
C न्यूमेरिकल अॅबिलिटी 15 15
D कंप्युटर (MS-Word, Excel, Internet इ.) 10 10

शारीरिक चाचणी (पुरुष)

वय शर्यत (1600 मी.) लाँग जम्प हाय जम्प
30 वर्षांपर्यंत 6 मिनिटे 14 फूट 3’9”
30 ते 40 वर्षांपर्यंत 7 मिनिटे 13 फूट 3’6”
40 वर्षांपेक्षा जास्त 8 मिनिटे 12 फूट 3’3”

शारीरिक चाचणी (महिला)

वय शर्यत (1600 मी.) लाँग जम्प हाय जम्प
30 वर्षांपर्यंत 8 मिनिटे 10 फूट 3’
30 ते 40 वर्षांपर्यंत 9 मिनिटे 9 फूट 2’9”
40 वर्षांपेक्षा जास्त 10 मिनिटे 8 फूट 2’6”

फॉर्म फी

1) शुल्क देय: ₹100/- (फक्त एकशे रुपये).
2) महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) या प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यात सूट दिली जाईल.
3) शुल्क BHIM UPI, नेट बँकिंग किंवा Visa, Mastercard, Maestro किंवा RuPay डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन भरता येईल.
4) उमेदवार 22 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11:00 वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन मोडद्वारे शुल्क भरू शकतील.
5) निर्धारित शुल्काशिवाय प्राप्त झालेला ऑनलाईन अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही आणि तो सरळ फेटाळला जाईल. शुल्क एकदा भरल्यावर कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाही.
6) पेमेंटशी संबंधित कोणतीही अडचण किंवा तक्रार असल्यास उमेदवार आपल्या लॉगिन पोर्टलमधून फीडबॅक प्रणालीद्वारे नोंदवू शकतो.


महत्वाच्या तारखा

घटना तारीख
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख 22-09-2025 ते 21-10-2025
ऑनलाईन अर्ज स्वीकृतीची शेवटची तारीख 21-10-2025
ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख 22-10-2025
फॉर्म दुरुस्तीची तारीख 29-10-2025 ते 31-10-2025
संभाव्य संगणकाधारित परीक्षा डिसेंबर 2025 / जानेवारी 2026

अधिकृत जाहिरात व अर्ज लिंक

अधिकृत माहिती महत्वाच्या लिंक
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 21 ऑक्टोबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

महत्त्वाच्या माहिती

1)अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी परीक्षेच्या अधिसूचनेत दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे.
2)उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी आपला ऑनलाईन अर्ज शेवटच्या तारखेपूर्वीच सादर करावा. शेवटच्या दिवशी वेबसाइटवर जास्त लोडमुळे लॉगिनमध्ये अडचण येऊ शकते किंवा कनेक्शन तुटू शकते. त्यामुळे अर्ज शेवटच्या तारखेला करण्याचे टाळावे.
3)उमेदवाराने आपले नाव व जन्मतारीख मॅट्रिक/माध्यमिक प्रमाणपत्रावर जसे आहे तसेच अचूकपणे लिहावे. जर जन्मतारखेमध्ये कोणताही फरक आढळला तर उमेदवारास परीक्षेत बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. दस्तऐवज पडताळणीदरम्यानही नाव किंवा जन्मतारीख वेगळी आढळल्यास उमेदवाराची पात्रता रद्द केली जाईल.
4)जे उमेदवार या अधिसूचनेनुसार अर्ज करू इच्छितात आणि ज्यांनी अद्याप आयोगाच्या नवीन वेबसाइटवर (https://ssc.gov.in) One-Time Registration (OTR) केलेली नाही, त्यांनी ती करणे आवश्यक आहे.
5)आयोगाने या परीक्षेसाठी आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण प्रणाली लागू केली आहे. सर्व उमेदवारांना One Time Registration दरम्यान आधार वापरून आपली ओळख प्रमाणीकरण करण्याचा पर्याय असेल. जे उमेदवार आधार वापरून प्रमाणीकरण करू इच्छित नाहीत त्यांनी खालील कागदपत्रांपैकी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे:
(i) नावाचा पुरावा: मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, शासकीय सेवा ओळखपत्र किंवा पेन्शन दस्तऐवज.
(ii) जन्मतारीखेचा पुरावा: जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, गॅझेटेड अधिकाऱ्याने दिलेले जन्मतारीख प्रमाणपत्र.
(iii) पत्त्याचा पुरावा: मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, अर्जदाराचा फोटो असलेले बँक स्टेटमेंट, भाडे करार, आयकर मूल्यांकन आदेश.
(iv) छायाचित्र.
(v) लिंगाचा पुरावा: मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र.
6)उमेदवारांची कागदपत्रे गोळा करणे आणि पडताळणी करण्याची प्रक्रिया दिल्ली पोलिसांकडून PE&MT/DV वेळी केली जाईल. त्यामुळे उमेदवाराची पात्रता अंतिम अर्ज सादरीकरणानंतर तात्पुरती स्वीकृत केली जाईल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वय, शारीरिक निकष आणि इतर अटी पूर्ण केल्या आहेत याची खात्री करून घ्यावी.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo