
ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागात विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. क्रीडा क्षेत्रात रस असलेल्या आणि सरकारी संस्थेत स्थिर नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती खूप उपयुक्त आहे. प्र. उपायुक्त (क्रीडा) आणि ठाणे महानगरपालिका यांच्या मार्फत ही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
या भरतीअंतर्गत पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता जाहिरातीत स्पष्ट दिली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी PDF जाहिरात नीट वाचणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 20,000 ते 25,000 रुपये मानधन दिले जाणार आहे. कामाचे ठिकाण ठाणे महानगरपालिका हद्दीत असेल.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन असून उमेदवारांनी स्वतःहून किंवा टपालाद्वारे आपला अर्ज दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह, फायर ब्रिगेड समोर, क्रिक रोड, ठाणे या पत्त्यावर सादर करणे अपेक्षित आहे. कोणत्याही अपूर्ण कागदपत्रांमुळे अर्ज बाद होऊ शकतो, त्यामुळे सर्व माहिती अचूक आणि व्यवस्थित जोडणे महत्वाचे आहे. Pdf जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2025 आहे. वेळेत अर्ज न केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. ही भरती सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या आणि क्रीडा क्षेत्राशी जोडलेले काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. अधिक माहितीसाठी आणि सविस्तर पात्रतेसाठी अधिकृत PDF जाहिरात अवश्य वाचा.