महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती 2025 | UMED MSRLM Bharti 2025

UMED MSRLM Bharti 2025 : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (MSRLM), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद अंतर्गत तालुक्यात एकात्मिक शेती प्रभाग (IFC) प्रकल्पांतर्गत IFC Block Anchor पदाची निवड करावयाची असल्याने पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तालुक्यात काम मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (MSRLM) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती व PDF जाहिरात खाली दिली आहे.

UMED MSRLM Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates for the post of IFC Block Anchor under the Integrated Farming Cell (IFC) project in the taluka under the Maharashtra State Rural Livelihood Mission (MSRLM), District Rural Development Mechanism, Zilla Parishad.

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव एकूण पदे मानधन शैक्षणिक पात्रता
IFC Block Anchor 01 ₹20,000/- प्रतिमाह
(निश्चित मासिक प्रवास देयक ₹2,500/- इतके राहील व मूल्यांकन अहवालानुसार मासिक मानधन अदा करण्यात येईल.)
किमान कृषी व कृषी संलग्न पदवी जसे की कृषी तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, पशुवैद्यक शास्त्र, डेअरी तंत्रज्ञान, मत्स्य व्यवसाय, वनस्पती विज्ञान किंवा तत्सम पदवी

मासिक वेतन व अधिक माहिती

◾भरती विभाग : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (MSRLM) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : IFC ब्लॉक अँकर.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 20,000 रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : कमाल ४३ वर्ष.
◾पदाचे नाव : IFC ब्लॉक अँकर.
◾इतर आवश्यक पात्रता :
1) किमान कृषी व कृषी सलग्न पदवी जसे कि कृषी तंत्रज्ञान Bachelor of science in Agriculture or Bachelor of Science in Horticulture or B.Tech.in Agriculture or Bachelor of science in Fishery, Bachelor of science in Forestry, Bachelor of Veterinary Science & Bachelor of Science in Animal Husbandry, Bachelor of Business Administration पदवीधारक असणे आवश्यक.
2) अनुभव निवडीचे निकष कृषी क्षेत्रातला किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक.
3) कृषी, फलोत्पादन, मत्स्यपालन, पशु पालन, मधमाशी पालन इ. क्षेत्रातील शेती आधारित उपक्रम याबाबत माहिती असणे आवश्यक.
4) उत्तम संवाद कौशल्य असणे आवश्यक व समुदायाला सुलभरीतीने समजावून सांगता येणे आवश्यक,
5) शेती व शेती आधारित मूल्य वर्धन साखळी उपक्रम अंमलबजावणी बद्दल माहिती असणे आवश्यक.
6) तांत्रिक ज्ञान संगणकीय ज्ञान असणे आवश्यक.
◾एकूण पदे : 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे.
◾नोकरी ठिकाण : गडचिरोली.
◾अर्ज सादर करतांना शैक्षणिक अर्हता तसेच अनुभव व संगणीय अर्हता असल्याचे दस्ताऐजव अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
◾निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा 40 गुण व तोंडी परीक्षा 10 गुण,
◾लेखी व तोंडी परीक्षेचे निकष : लेखी परीक्षेची काठीण्य पातळी डिप्लोमा राहील.
◾लेखी परीक्षेचे विषय व गुणांकन पुढीलप्रमाणे राहील.
बुद्धिमत्ता चाचणी ५ गुण
गणित – ५ गुण
कृषी व कृषी सलग्न ३० गुण
◾सदर परीक्षा हि बहुपर्यायी असेल.
◾तोंडी परीक्षा हि १० गुणांची असेल. तोंडी परीक्षेमध्ये संबधित व्यक्तीचे संवाद कौशल्य, कामाचा अनुभव, प्रात्यक्षिक अनुभव यांसारख्या बाबीच्या आधारावर गुणांकन करण्यात येईल.
◾सदर पदाकरिता परिपूर्ण भरलेले अर्ज (शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रतीसह) अंतिम तारीख ०५.०० वाजेपर्यंत व्यक्तीशः / टपालाद्वारे / मेलव्दारे विहित मुदतीत खालील कार्यालयात कार्यालयीन वेळेत पोहचतील अशा बेताने सादर करण्यात यावे.
◾विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी.

भूमिका व जबाबदारी

१. कार्यक्षेत्रातील प्रभागातील वरिष्ठ CRP इतर समुदाय संसाधन व्यक्ती यांच्याशी नियमित समन्वय साधून प्रभागाचे कामाचे नियोजन करणे.
२. CRP यांच्याकडून प्रभागातील मुलभूत सर्वेक्षण करून, मिळालेल्या माहितीच्या आधारावर सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करणे. व त्याची अंमलबजावणी करणे.
३. प्रभागस्तरावर प्रकल्पाचे निरीक्षण आणि मूल्यमापन करून सदरचा अहवाल LSC कार्यकारिणी समिती, जिल्हा व तालुका अभियान कक्षास अहवाल सादर करणे.
४. प्रभागातील महिलांच्या उपक्रमांना (शेतातील पिके, शेतीआधारित उपक्रम) यांना प्रत्यक्ष भेटी देऊन कामाचा आढावा घेणे व आवश्यक मार्गदर्शन करणे.
५. प्रभागाचा मासिक कृती आराखडा तयार करून आराखडा प्रमाणे कामे होनेस्तव प्रयत्न करणे. तसेच सदर कामाचा अहवाल तालुका व्यवस्थापक आणि जिल्हा व्यवस्थापक उपजीविका यांना दरमहा सादर करणे.
६. प्रभागनिहाय प्रोडक्ट डेवलोपमेंट करून त्याची पॅकेजिंग, ब्रँडिंग व संबधित मार्केटिंग उपक्रमाकरिता कामे पाहणे तसेच LSC चे व्यवस्थापन करणे, उपक्रम निहाय लेखे व बैठकीचे इतिवृत्त अद्यावत ठेवणे आणि वैविध्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी करणे.
७. प्रभागांमधील विविध प्रक्रिया युनिट (Processing Unit), एकत्रीकरण सेंटर (Collection Center), निविष्ठा यांची नियमित देखरेख करणे तसेच महिलांना तांत्रिक सहाय्य करणे.
८. LSC कामाच्या प्रगतीचा आढावा घेणे, अद्यावत प्रगतीचा MIS राखणे इ.

अधिकृत जाहिरात व अर्ज लिंक

अधिकृत माहिती महत्वाच्या लिंक
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo