महाराष्ट्र वनविभाग भरती 2025 | पदे : डेटा एन्ट्री ऑपरेटर व इतर | मासिक वेतन : 20,000 ते 50,000 रुपये | Vanvibhag Bharti 2025

Vanvibhag Bharti 2025 : महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, कार्यालय मध्ये Data Entry Operator (डाटा एन्ट्री ऑपरेटर) व इतर रिक्त पदाची नेमणुक करावयाची आहे. त्या करिता पात्र इच्छुक उमेदवारांना कडून अर्ज मागविण्यात आले आहेत. वन विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे. भरतीची जाहिरात पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

Vanvibhag Bharti 2025 : The Maharashtra Forest Department is recruiting Data Entry Operator and other vacant posts in the Pench Tiger Project Conservation Foundation, Office. Applications have been invited from eligible and interested candidates.

पदाचे नाव व मासिक पगार

अनुक्रमांक पदाचे नाव एकूण पदे मानधन
1 Law Officer (कायदा अधिकारी) 02 ₹50,000/-
2 निसर्ग पर्यटन व्यवस्थापक (Eco-tourism Manager) 02 ₹20,000/-
3 Data Entry Operator (डेटा एंट्री ऑपरेटर) 02 ₹25,000/-

महत्त्वपूर्ण माहिती : वनविभाग भरती 2025

◾भरती विभाग :  महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : वनविभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 20,000 ते 50,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाइन (ई- मेल) / ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : Law Officer (कायदा अधिकारी), Eco-tourism Manager (निसर्ग पर्यटन व्यवस्थापक), Data EntryOperator (डाटा एन्ट्री ऑपरेटर).


पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :

Law Officer (कायदा अधिकारी) :

कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतलेली अखिल भारतीय बार परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यांनी अडव्होकेट्स अक्टनुसार राज्य बार कौन्सिलमध्ये वकिल म्हणून नोंदणी केलेली पाहिजे. शैक्षणिक अर्हता व अनुभव.
१) मान्यता प्राप्त विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर व सनदधारक.
२) जिल्हा न्यायाधिश, सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश, सेवानिवृत्त प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा विधी व न्याय विभागामधुन सेवानिवृत्त झालेले सहसचिव/उपसचिव/अवर सचिव या दर्जाचे अधिकारी या शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेले असावा.
३) करार पध्दतीने नियुक्ती करावयाचा सेवानिवृत्त अधिकारी शारिरीक, मानसिक वा आरोग्याचे दृष्टीने सक्षम असावा. तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्यांचेकडे आवश्यक क्षमता असावी.
४) अतिरिक्त पात्रता : नागपूर प्रादेशिक वनवृत्तांर्गत नागपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया या वनविभागातील व सामाजिक वनीकरण विभागातील तसेच अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)-पूर्व, नागपूर व त्यांचे अधिनस्त असलेल्या सर्व वन्यजीव विभागातील आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), म.रा., नागपूर कार्यालयातील जमिन विषयक, वनगुन्हे व आस्थापना विषयक तसेच इतर न्यायालयीन प्रकरणांमध्ये शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी व न्यायालयीन प्रकरणांचा तातडीने पाठपुरावा करुन निपटारा करण्यासाठी. वनविभागाचे न्यायालयीन प्रकरण हाताळण्याचे किमान २ वर्षाचा अनुभव.

▪️Eco-tourism Manager (निसर्ग पर्यटन व्यवस्थापक)

१) कोणत्याही शाखेत पदवी / एमबीए / हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका असल्यास प्राधान्य इंग्रजी हिन्दी व मराठी भाषा सहजतेने वाचता लिहता व बोलण्यास सक्षम असावा.
२) वनविभागात काम केलेले असल्याचा किमान १ वर्षाचा अनुभव.

Data EntryOperator (डाटा एन्ट्री ऑपरेटर) :

१) कोणत्याही शाखेतील पदवीधर, तसेच MS-CIT परीक्षेत उत्र्तीर्ण, टंकलेखन वेग इंग्रजी-४० शप्रमी, मराठी-४० शप्रमी.
२) किमान 2-3 वर्षाचा अनुभव तसेच मुलभुत संगणक ऑपरेटिंग सिस्टिमचे ज्ञान असने आवश्यक आहे. इंटरनेट आणि ई-मेलवरही काम करता आले पाहिजे. तसेच MS-Office, MS-Word, MS-Excel व Power Point इ. चे चांगले ज्ञान असावे.
◾एकूण पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नागपूर. (Vanvibhag Bharti 2025)

अटी

1) या पदाकरीता मराठी व इंग्रजीचे पुरेसे ज्ञान (वाचता, लिहीणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
2) निवड झालेल्या उमेदवारास वरील तक्त्यात दर्शविलेल्या मुख्यालय ठिकाणी काम करावे लागेल.
3) पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर पदभरती (कंत्राटी पध्दतीवर) सदर पदाकरीता बायोडाटा (Resume) व अर्ज  (Application) तसेच वरील प्रमाणे दर्शविलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता बाबतचे मुळ दस्ताऐवज मुलाखतीच्या वेळेस दाखविण्यात यावे.
4) उमेदवार हा कोणत्याही इतर शासकीय, निमशासकीय, अशासकीय संस्था किंवा संघटना यांचा पदाधिकारी असता कामा नये.
5) सदर पदे ही पुर्णवेळ असल्याने या काळात उमेदवाराला इतरत्र काम/प्रॅक्टीस करता येणार नाही.
6) नियुक्ती झालेल्या कंत्राटी पदास 24 तास सेवेकरीता तत्पर राहणे बंधनकारक राहील. मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांचे आदेशान्वये पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यक्षेत्रात कोणत्याही ठिकाणी कार्य करावे लागेल.
7) नियुक्त प्राधिकारी समितीने घेतलेला निर्णय अंतिम राहिल यांची कृपया उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अधिकृत जाहिरात व अर्ज लिंक

अधिकृत माहिती महत्वाच्या लिंक
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 17 ऑक्टोबर 2025, संध्याकाळी 05:00 पर्यंत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर यांचे कार्यालय पहिला माळा, नविन प्रशासकिय इमारत (वन भवन), शासकिय मुद्रणालयाजवळ, झिरो माईल, सिव्हील लाईन, नागपूर ४४० ००१.
◾ई-मेल पत्ता : edpenchfoundation@mahaforest.gov.in
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo