महाराष्ट्र वनविभाग भरती 2025 | मासिक वेतन : 20,000 ते 50,000 रूपये | Maharashtra Vanvibhag Bharti 2025

Maharashtra Vanvibhag Bharti 2025 : नोकरी शोधताय? महाराष्ट्र वनविभाग मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान मध्ये विविध पदाची नेमणुक करावयाची आहे. त्या करिता पात्र इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. वन विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठांन द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. Pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

Maharashtra Vanvibhag Bharti 2025 : There is a good opportunity to get a job in Maharashtra Vanvibhag. Various posts are to be appointed in Tadoba-Andhari Tiger Project Conservation Foundation. For that, applications have been invited from eligible interested candidates through online mode.

पदे वयोमर्यादा व मानधन

अ. क्र. पदनाम एकूण पदे वयोमर्यादा मासिक मानधन
1 GIS डेटा मॅनेजर 1 18–40 ₹30,000/-
2 आउटरीच ऑफिसर (Teach for Tadoba Project) 1 18–40 ₹50,000/-
3 प्रोजेक्ट असिस्टंट (Teach for Tadoba Project) 1 18–40 ₹20,000/-

महाराष्ट्र वनविभाग भरती 2025 : आवश्यक माहिती :

◾भरती विभाग : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठांन द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 
◾भरती प्रकार : वनविभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदे : विविध पदे. जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 20,000/- ते 50,000/- रुपये पर्यंत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 वर्षे ते 40 वर्षे.
◾पदाचे नाव : जीआयएस डेटा मॅनेजर, आउटरीच ऑफिसर आणि प्रोजेक्ट असिस्टंट.
◾इतर आवश्यक पात्रता :
▪️GIS डेटा व्यवस्थापक :
1] भूगोल, भू-माहितीशास्त्र, पर्यावरण विज्ञान, संगणक विज्ञान या विषयात बॅचलर पदवी.
2] आर्क जीआयएस, क्यूजीआयएस किंवा तत्सम साधनांसारख्या भौगोलिक माहिती प्रणाली (६१५) सॉफ्टवेअरमध्ये प्रवीणता.
3] रिमोट सेन्सिंग तंत्र आणि उपग्रह प्रतिमा विश्लेषणाचे ज्ञान.
4] स्थानिक डेटा संकलन, मॅपिंग आणि विश्लेषणाचा अनुभव.
5] वन विभागात काम करण्याचा अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
▪️आउटरीच अधिकारी (ताडोबा प्रकल्पाचे शिक्षक):
1] पदवी आणि एमबीए उमेदवार. पीए सोबत काम करण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
2] बालशिक्षणासाठी दुर्गम भागात काम करण्याचा अनुभव.
3] समुदायासोबत काम करण्याचा किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक असेल.
4] विशेषतः इंग्रजीमध्ये मजबूत संवाद कौशल्य आवश्यक असेल.
▪️प्रकल्प सहाय्यक (ताडोबा प्रकल्पासाठी शिक्षक):
1] शिक्षण किंवा संबंधित क्षेत्रात पदवीधर/पदव्युत्तर पदवी.
2] किमान १ वर्षाचा FLN अध्यापनाचा अनुभव, शक्यतो आदिवासी/ग्रामीण समुदायांमध्ये.
3] प्रकल्प व्यवस्थापन, कार्यक्रम समन्वय किंवा सामुदायिक उपक्रमांमध्ये पूर्वीचा अनुभव.
4] इंग्रजी, मराठी आणि हिंदी (बोलता आणि लेखन) या भाषेत चांगली प्रवीणता.
5] सर्जनशील, क्रियाकलाप-आधारित शिक्षण साहित्य डिझाइन करण्याची आणि वितरित करण्याची क्षमता.
6] शिक्षण, संवर्धन आणि सामुदायिक विकासाची आवड.
7] प्रकल्पातील गावांमधून प्रवास करण्यासाठी वैध परवाना असलेली दुचाकी वाहन असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : चंद्रपूर. (Maharashtra Vanvibhag Bharti 2025)
◾उमेदवाराने आपला अर्ज जाहीरातीसोबत दिलेल्या लिंकव्दारे उघडणाऱ्या ऑनलाईन पध्दतीनेच करावा. लिंक संबंधी कोणतीही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत या कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 07172-251414 वर संपर्क करावा, अथवा वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांचे कार्यालय, मुल रोड, चंद्रपूर-442401 पत्यावर या कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क करावा.
◾मुलाखतीकरीता येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता (TA/DA) लागू राहणार नाही. उमेदवारांना मुलाखतीची तारीख, वेळ व स्थळ वेगळयाने कळविण्यात येईल.
◾वैयक्तिक मुलाखतीकरीता पात्र उमेदवारांच्या आवेदन अर्जातील नमुद भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडीवरच या कार्यालयाव्दारे संपर्क केल्या जाईल. तसेच या कार्यालयामार्फत संपर्क करतांना उमेदवारांनी त्यांचे भ्रमणध्वनी व ई-मेल आयडीवरुन प्रतिसाद न दिल्यास किंवा मुलाखतीस उमेदवार उपस्थित नसल्यास त्यांना मुलाखतीमध्ये अपात्र ठरविण्यात येईल.

नियम व अटी :

1) भ्रमणध्वनी व ई-मेल आयडीवरुन प्रतिसाद न दिल्यास किंवा मुलाखतीस उमेदवार उपस्थित नसल्यास त्यांना मुलाखतीमध्ये अपात्र ठरविण्यात येईल.
2) वरिल पदांचे कामे ही पूर्णवेळ असल्याने नियुक्ती कालावधीत उमेदवाराला इतरत्र कुठेही काम/प्रॅक्टीस करता येणार नाही.
3) वरील सर्व पदाचे मुख्यालय चंद्रपूर असुन निवड झालेल्या उमेदवारास कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठांन, चंद्रपूर यांचे आदेशानुसार त्यांचे कार्यक्षेत्रामधील ईतर कोणत्याही ठिकाणी काम करावे लागेल.
4) उमेदवार हा कोणत्याही इतर शासकीय, निमशासकिय, अशासकीय संस्था किंवा इतर संघटना यांचा पदाधिकारी असता कामा नये.
5) आवश्यकतेनुसार जाहिरातीमधील पदे व इतर निर्णयामध्ये बदल करण्याचा अधिकार कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठांन, चंद्रपूर/निवड समिती यांनी राखून ठेवीत आहे.

अधिकृत जाहिरात व अर्ज लिंक :

अधिकृत माहिती महत्वाच्या लिंक
PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. (Vanvibhag Bharti 2025)
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo