वनविभाग पुणे मध्ये नोकरी मिळवा | PDF जाहिरात येथे पहा | Vanvibhag Pune Bharti 2025

Vanvibhag Pune Bharti 2025 : केंद्र शासनाचे वन, पर्यावरण व हवामान बदल विभागामार्फत राबविणेत येत असलेल्या ‘राष्ट्रीय हरित सेना योजना’ अंतर्गत राज्यात इको क्लब शाळा स्थापित करण्यात आलेल्या आहेत. सदर इको क्लब शाळांमध्ये Environment Education Programme अंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. सदर राबविणेत येत असलेल्या उपक्रमांची अंमलबजावणी, समन्वय, पर्यवेक्षण, माहिती संकलन व अन्य विवक्षित कामांकरिता प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयात रिक्त पद भरायचे आहे. याकरिता पात्र व इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.

Vanvibhag Pune Bharti 2025 : Maharashtra Forest Department has a vacant post to fill in Pune office. Applications are invited from eligible and interested candidates. See PDF advertisement and application form below.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : महाराष्ट्र वनविभाग द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : –
◾अधिकृत pdf जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीनें अर्ज स्वीकारले जात आहेत.
◾पदाचे नाव : राष्ट्रीय हरित सेना योजना समन्वयक.
◾आवश्यक पात्रता :
१. अर्जदार पर्यावरण विज्ञान / वनीकरण / वनस्पतीशास्त्र किंवा संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर धारक असावा.
२. अर्जदार पर्यावरण शास्त्र या शाखेचा पदव्युत्तरधारक असल्यास प्राधान्य दिले जाईल.
३. पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था किंवा समुदाय आधारित कार्यक्रमांमध्ये कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. सोबत अनुभवाचे प्रमाणपत्र सादर करावे.
४. वने, पर्यावरणीय कायदे आणि नियमांचे ज्ञान यांचेबाबत माहिती असावी.
५. उत्कृष्ट संभाषण कौशल्य तसेच इंग्रजी, मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असावे.
६. संगणक हाताळण्याचे कौशल्य असावे (MS Office, ई-मेल संवाद व मुलभूत डिजिटल साधनांमध्ये प्राविण्य).
◾मुलाखत : अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची मुलाखत प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयात दि. ०३/११/२०२५ रोजी ११:०० वा. निवड समिती मार्फत घेण्यात येईल.
◾एकूण पदे : 01 जागा.
◾नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 29 ऑक्टोंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता व ई-मेल आयडी:
१. अर्जदार त्यांचे अर्ज खालील नमुद पत्त्यावर पोस्टाव्दारे / प्रत्यक्ष हजर राहून किंवा peefsfd@mahaforest.gov.in / peefsfm@gmail.com या ई-मेल आयडीवर सादर करु शकतात.
२. कार्यालयाचा पत्ता- प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय, मध्यवर्ती इमारत, पुणे- ४११००१
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo