ZP Bharti 2025 : जिल्हा परिषद, संचलित राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशला मधील रिक्त पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. तरी इच्छुक व शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पुर्ण उमेदवारांनाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
ZP Bharti 2025 : Appointments will be made to the vacant posts in Zilla Parishad, Sanchalit Rajarshi Shahu Chhatrapati Vidyaniketan and Residential Sports Complex. However, applications are invited from interested and qualified candidates.
पदाचे नाव व वेतन :
| अ. क्र. | पदाचे नाव | मासिक मानधन |
|---|---|---|
| 1 | खो-खो प्रमुख क्रीडा प्रशिक्षक | ₹20,000/- |
| 2 | कुस्ती प्रमुख क्रीडा प्रशिक्षक | ₹20,000/- |
| 3 | कबड्डी प्रमुख क्रीडा प्रशिक्षक | ₹20,000/- |
| 4 | कबड्डी सहाय्यक क्रीडा प्रशिक्षक | ₹12,000/- |
| 5 | मैदानी सहाय्यक प्रशिक्षक | ₹12,000/- |
| 6 | स्वीपर (महिला) | ₹12,000/- |
| 7 | स्वीपर (पुरुष) | ₹12,000/- |
| 8 | रग्बी क्रीडा प्रशिक्षक | ₹10,000/- |
जिल्हा परिषद भरती 2025 : आवश्यक माहिती :
◾भरती विभाग : जिल्हा परिषद द्वारे भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : जिल्हा परिषद अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदे : विविध पदे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन (समक्ष अथवा पोष्टाने) अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : खो-खो प्रमुख क्रीडा प्रशिक्षक, कुस्ती प्रमुख क्रीडा प्रशिक्षक, कबड्डी प्रमुख क्रीडा प्रशिक्षक, कबड्डी सहाय्यक क्रीडा प्रशिक्षक, मैदानी सहाय्यक प्रशिक्षक, रेक्टर (महिला), रेक्टर (पुरुष), रग्बी क्रीडा प्रशिक्षक.
◾इतर आवश्यक पात्रता :
▪️खो-खो प्रमुख क्रीडा प्रशिक्षक : एन.आय.एस. (खो-खो खेळ), पदविका प्राप्त तीन वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव अथवा बी.पी.एड. (BPEd) / एम.पी.एड (MPEd) व खो-खो खेळातील मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू आणि तीन वर्षे खो-खो खेळाच्या प्रशिक्षणाचे अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️कुस्ती प्रमुख क्रीडा प्रशिक्षक : एन.आय.एस. (कुस्ती खेळ), पदविका प्राप्त व तीन वर्षे प्रशिक्षणाचे अनुभव अथवा बी.पी.एड. (BPEd) / एम. पी. एङ (MPEd) व कुस्ती खेळातील मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू आणि तीन वर्षे कुस्ती खेळाच्या प्रशिक्षणाचे अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️कबडडी प्रमुख क्रीडा प्रशिक्षक : एन. आय. एस. (कबडडी खेळ), पदविका प्राप्त व तीन वर्षे प्रशिक्षणाचे अनुभव अथवा बी.पी.एड. (BPEd) / एम.पी. एङ (MPEd) व कुस्ती खेळातील मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू आणि तीन वर्षे कबडडी खेळाच्या प्रशिक्षणाचे अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️कबडडी सहाय्यक क्रीडा प्रशिक्षक : एन.आय.एस. (कबडडी खेळ), पदविका प्राप्त व तीन वर्षे प्रशिक्षणाचे अनुभव अथवा बी.पी.एड. (BPEd) / एम.पी. एड (MPEd) व कुस्ती खेळातील मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू आणि तीन वर्षे कबडडी खेळाच्या प्रशिक्षणाचे अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️मैदानी सहाय्यक प्रशिक्षक : एन.आय.एस. मैदानी स्पर्धा प्रशिक्षक पदविका प्राप्त व त्तीन वर्ष प्रशिक्षणाचे अनुभव अथवा बी.पी.एड. (BPEd) / एम.पी.एड (MPEd) व मैदानी खेळातील मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पदक विजेता खेळाडू.
▪️रेक्टर (महिला) : एम.एस. डब्लु आवश्यक बी.पी.एड. असल्यास प्राधान्य.
▪️रेक्टर (पुरुष) : एम.एस. डब्लु आवश्यक बी.पी.एड. असल्यास प्राधान्य
▪️रग्बी क्रीडा प्रशिक्षक : बी.पी.एड. (BPEd) / एम.पी.एड (MPEd) / एन.आय.एस. (रग्बी खेळ), पदविका किंवा वर्ल्ड रग्बी परीक्षा पास तसेच आंतरराष्ट्रीय वरिष्ठ खेळाडू तसेच तीन वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव.
◾नोकरी ठिकाण : कोल्हापूर.
अधिकृत जाहिरात व अर्ज लिंक :
| अधिकृत माहिती | महत्वाच्या लिंक |
|---|---|
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 13 ऑक्टोबर 2025 सकाळी 11.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत फक्त.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : शिक्षण अधिकारी (प्राथमिक) शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कार्यालय, कोल्हापूर – जिल्हा – कोल्हापूर, ४१६००३
◾सविस्तर माहितीसाठी PDF जाहिरात वाचा.
नियम व अटी:
1) अर्जात पत्रव्यवहाराचा पत्ता जवळच्या खुणेसह (Land Mark) नमूद करावा. तसेच संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक आणि स्वतःचा ई मेल आयडी नमूद करावा.
2) उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
3) अपुर्ण आणि चुकीची माहिती भरलेले अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि त्याबाबत कोणत्याही प्रकारचा कार्यालयाकडून पत्रव्यवहार केला जाणार नाही.
4) क्रीडा प्रशिक्षकांना विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशालेकडे दररोज सकाळी 06.00 ते 9.00 आणि सायंकाळी 4.00 ते 7.00 या वेळेत तसेच वेळोवेळी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यासोबत स्पर्धेसाठी सरावासाठी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
5) क्रीडा प्रशिक्षकांनी सुटटीमध्येदेखील काम करणे बंधनकारक राहील.
6) उमेदवारांने निवासी राहणे बंधनकारक आहे.
7) निव्वळ कंत्राटी मानधन तत्वावरील 11 महिन्यासाठी नियुक्ती असलेने कोणत्याही परिस्थीतीत उमेदवाराला सेवेत कायम करणे किंवा नियमित सेवेचा लाभ मिळणार नाही. तसेच कायमस्वरूपाची नियुक्ती दिली जाणार नाही.
8) निवड झालेल्या उमेदवाराला रु. 500/- स्टॅम्पपेपरवर करारपत्र करुन देणे बंधनकारक राहील.
9) सदरच्या पदासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे सत्यप्रत करुन अर्जासोबत जोडावे लागेल. कागदपत्रे सत्यप्रत करून न जोडलेस अर्ज / उमेदवाराला अपात्र ठरविले जाईल.
10 ) पात्र उमेदवारांची यादी जिल्हा परिषद, कोल्हापूरकडील नोटीस बोर्डार्थ्यांवर प्रसिध्द करण्यात येईल.
11) अर्जावर अलिकडचा फोटो लावून तो राजपत्रित अधिकारी विशेष कार्यकारी अधिकारी मुख्याध्यापक प्राचार्य यांचेकडून सांक्षाकित करणे बंधनकारक आहे.
12) मागास प्रवर्गातील उमेदवार असतील तर त्यांनी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र अथवा जात प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील.
13) अर्जाच्या लिफाफ्यावर ज्या पदासाठी अर्ज सादर केलेला आहे त्या पदाचा खेळाचा उल्लेख करावा.
14) उमेदवाराला लेखी अथवा तोंडी मुलाखातीसाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता कार्यालयाकडून दिला जाणार नाही.
15) उमेदवार नियुक्त केलल्या उमेदवाराचा कालावधी पुर्ण झालेनंतर मुदतवाढ देणे अगर कसे याबाबतचा निर्णय कार्यालयाने राखून ठेवला आहे.