ZP Data Entry Operator Bharti 2025 : प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत शालेय व क्रीडा विभाग यांचेकडील शासन निर्णय नुसार शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त असणारी डाटा एंन्टी ऑपरेटरची रिक्त पदे एकत्रित मानधनावर भरण्यात येणार आहेत. त्या करिता पात्र व इच्छुक उमेदवारांनाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. शालेय व क्रीडा विभाग मधले रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा परिषद, शिक्षण विभाग (प्राथमिक) (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
ZP Data Entry Operator Bharti 2025 :The vacant posts of Data Entry Operator under the Education Department (Primary) Zilla Parishad will be filled on a combined salary basis. Applications are invited from eligible and interested candidates for the same. A good and excellent opportunity has been created for 12th pass candidates to get a job.
जिल्हा परिषद भरती 2025 : पदाचे नाव व रिक्त पदे :
| अ. क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या | मासिक एकत्रित परिश्रमिक / मानधन | शैक्षणिक व व्यवसायिक अर्हता |
|---|---|---|---|---|
| 1 | डेटा एन्ट्री ऑपरेटर | 5 | ₹25,000/- |
1. किमान 12 वी पास 2. मराठी टंकलेखन – 30 श. प्र. मि. 3. इंग्रजी टंकलेखन – 40 श. प्र. मि. 4. एम.एस.सी.आय.टी. किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण |
ZP Data Entry Operator Bharti 2025 – आवश्यक माहिती :
◾भरती विभाग : जिल्हा परिषद, शिक्षण विभाग (प्राथमिक) (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना) द्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : 25,000 रुपये.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
निवड पध्दती :
- शैक्षणिक व व्यावसायिक अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या उमेदवारास इ. 10 वी, इ. 12 वी मध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी पांची एकत्रित बेरीज करुन त्यामध्ये उमेदवार पदवीधर असल्यास त्यास 10 गुण बोनस देण्यात येतील. गुणांकन करुन उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. गुणवत्ता यादीतील उमेदवारांना संगणक परिक्षेकरीता, एका पदासाठी गुणानुक्रमे 12 उमेदवार याप्रमाणे बोलावण्यात येतील.
- सदर यादीमधील उमेदवारांची मराठी टायपिंग 30 शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आणि संगणक ज्ञानाची प्रात्याक्षिक परीक्षा घेण्यात येईल. यासाठी सर्व मिळून 100 गुण देण्यात येतील व अशी एकूण 100 गुणांची परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येईल.
- उपरोक्त नं 2.1 व 2.2 मधील गुण एकत्रित करून गुणानुक्रमे मंजूर पदासाठी निवड यादी प्रसिध्द केली जाईल आणि त्यानुसार सदर उमेदवारांना कंत्राटी पध्दतीने तात्पुरत्या स्वरूपात डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती देण्यात येईल व तेवढयाच, पुढील उमेदवारांची प्रतिक्षा यादी प्रसिध्द केली जाईल.
भरतीचे वेळापत्रक :
| अ. क्र. | तपशील | दिनांक |
|---|---|---|
| 1 | जाहिरात दिनांक | 22/09/2025 |
| 2 | अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक | 30/09/2025 |
| 3 | प्राप्त अर्जाच्या छाननीचा दिनांक | 01/10/2025 ते 03/10/2025 |
| 4 | गुणानुक्रमे गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे | 07/10/2025 |
| 5 | गुणानुक्रमे प्रसिद्ध यादी संदर्भात आक्षेप मागविणे | 08/10/2025 ते 09/10/2025 |
| 6 | अंतिम पात्र व अपात्र यादी प्रसिद्ध करणे | 13/10/2025 |
| 7 | पात्र उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक | 27/10/2025 |
| 8 | निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्याचा दिनांक | 29/10/2025 |
अंतिम दिनांक व सविस्तर माहिती:
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे.
◾पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर.
◾इतर आवश्यक पात्रता :
१} किमान १२ वी पास असणे आवश्यक आहे.
२} मराठी टंकलेखन ३० श. प्र. मि.
३} इंग्रजी टंकलेखन- ४० श. प्र. मि.
४} एम. एस. सी. आय. टी. किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.
◾एकूण पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : रत्नागिरी.
◾परीक्षेचे स्वरुपवरील तक्ता : परिच्छेद मधील अर्हता धारणकरणा-या उमेदवारांची मराठी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग ४० प्रति मिनिटआणि संगणक ज्ञानाची प्रात्याक्षिक परीक्षा या साठी सर्व मिळून १०० गुण देण्यात येतील.
◾भरती प्रक्रिये च्या वेळापत्रका मध्ये बदल करणे, पदांची संख्या कमी जादा करणे अथवा भरतीप्रक्रियेस स्थगित देण्याचे सर्वाधिकार जिल्हा परिषद निवड समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद, रत्नागिरी या कार्यालयात.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
अधिकृत जाहिरात व अर्ज लिंक :
| अधिकृत माहिती | महत्वाच्या लिंक |
|---|---|
| PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अर्ज कसा कराल?
- उमेदवारांनी विहीत नमुन्यात अलीकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज सादर करावा, सदर अर्जाच्या पाकिटांवर डाटा एन्ट्री ऑपरेटर (प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना) पदाकरीता अर्ज असे नमुद करावे.
- अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, वय, अनुभव इत्यादी संदर्भातील कागदपत्रांच्या छायांकित साक्षांकित प्रती जोडाव्यात.
- अर्ज दिनांक 30/09/2025 पर्यंत सकाळी 10.00 ते सायं. 06.00 या वेळेत, समक्ष अथवा पोष्टाने, सुट्टीचे दिवस वगळून स्विकारले जातील. त्यानंतर आलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्विकारले जाणार नाहीत.
- पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द झालेनंतर त्या उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करून त्यावर उमेदवाराचा अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवून व साक्षांकित करून प्रवेश पत्रावर नमूद असलेल्या परिक्षेच्या ठिकाणी नमूद वेळेच्या अगोदर उपस्थित रहावे. सविस्तर सूचना प्रवेश पत्रावर देण्यात येतील.
- परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांकडून नियुक्तीपूर्वी शासनाकडील विहीत नमुन्यात करारनामा करुन घेण्यात येईल आणि त्यासोबत उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा व आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करावे लागेल, कंत्राटी पध्दतीने नियुक्त केलेल्या डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासंबंधी सेवा शर्ती, शैक्षणिक अर्हता, एकत्रित ठोक मानधन व नियुक्ती कार्यपध्दती यासंबंधी आवश्यक ते बदल तसेच निर्णय घेण्याचे आधिकार शासनास राहतील.
- डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्त केलेल्या कंत्राटी पध्दतीच्या कर्मचाऱ्यास नियमित सेवेचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत.
- सदर पदांची भरती कंत्राटी पध्दतीने करावयाची असल्याने बिंदू नामावली प्रमाणे पदे भरण्याची आवश्यकता नाही.
- अंतीम निवड यादी प्रसिध्द करणेपुर्वी रिक्त पदांची संख्या वाढल्यास याच यादीमधून रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल.